PM Suryodaya Yojana : सौरउर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' राबवली जाणार: मोदी

Pradhan mantri Suryodaya Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अयोध्येतील राम मंदिराचे उद्धाटन केले. तसेच त्यांनी रामाच्या नव्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी नव्या योजनेची घोषणा केली.
PM Suryodaya Yojana
PM Suryodaya YojanaAgrowon

Pune News : अयोध्येतील राम श्री राम मंदिराचा उद्धाटन सोहळा सोमवारी (२२ रोजी) पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या नव्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर देशाला मोदींनी संबोधित केले. त्यावेळी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या नावाने सुरू करण्याची घोषणा केली. स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारी ही योजना असेल असे मोदींनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशातील कोटीहून अधिक घरांच्या छतावर सोलर प्लेट बसविण्यात येणार आहेत.

PM Suryodaya Yojana
PM Modi visit to Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा अन् रोड शो....

या योजनेबाबत मोदींनी समाजमाध्यावर पोस्ट लिहीत माहिती दिली. त्यांनी, X वर लिहिले की, 'जगातील तमाम भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर माझ्या संकल्पाला अधिक बळ मिळाले आहे. तसेच देशवासियांच्या घरावर स्वतःचे सोलर रूफ असावे. त्यासाठी अयोध्येहून परतताच, १ कोटी घरांच्या छतावर सोलर रूफ बसविण्यासाठी “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्याचा मी पहिला निर्णय घेतला. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल असे मोदींनी म्हटलं आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ

मोदींनी याबाबत त्यांच्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. त्यात, या योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ मिळेल. कारण हा वर्ग आजही दर महिन्याला आपल्या कमाईचा मोठा हिस्सा वीज बिलाच्या स्वरूपात खर्च करतो. तर वीज बिल हा देशातील असा एक मुद्दा आहे ज्यावर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राजकारण केले जाते. प्रत्येक वेळी लोकांना वीज बिल माफ करण्याचे किंवा कमी करण्याचे आश्वासन दिले जाते.

PM Suryodaya Yojana
PM Modi In Surat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन

सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन

पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर रूफ बसवल्या जातील. ज्याने लोकांना विजेच्या समस्येपासून दिलासा मिळेल.

मात्र, ही योजना कोठून सुरू होणार याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. याआधीही देशात स्वच्छ ऊर्जा म्हणून सौरऊर्जेच्या वापराला चालना दिली जात आहे. याअंतर्गत सरकारी कार्यालयांवर छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे मोटारपंपही दिले जात आहेत जेणेकरून विजेचा वापर कमी करता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com