PM Modi In Surat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन

Aslam Abdul Shanedivan

सुरतच्या वैभवात भर

सुरत शहराच्या वैभवात आज आणखी एका वैशिष्ट्याची भर पडली. जे जगातील सर्वात मोठ्या इमारतींची चमक देखील फिकी पाडेल. वस्त्रोद्योग आणि पर्यटन क्षेत्रासह हिरे उद्योगाला चालना देणाऱ्या सूरत डायमंड एक्सचेंजचे उद्धघाटन पार पडले.

PM Modi In Surat | Agrowon

सुरत डायमंड बोर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे जगातील सर्वात मोठ्या हिरे कार्यालयीन संकुलाचे उद्घाटन केले. हे संकुल येथून पुढे सुरत डायमंड बोर्स या नावाने ओळखले जाईल.

PM Modi In Surat | Agrowon

जगातील सर्वात मोठे केंद्र

ही इमारत आता जगातील सर्वात मोठे हिरे कार्यालय बनले असून ज्याचे क्षेत्रफळ 67 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त आहे. या इमारतीने अमेरिकेतील पेंटागॉनच्या मुख्यालयाच्या इमारतीलाही मागे टाकले आहे. यात 4,500 हून अधिक हिरे व्यापार कार्यालये आहेत.

PM Modi In Surat | Agrowon

नवीन रोजगाराच्या संधी आणि सुरक्षा

सूरत डायमंड बोर्समुळे येथे नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना अंदाजे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळेल. तर या इमारतीत अत्याधुनिक सुविधांसह सुरक्षेसाठी 4000 हून अधिक कॅमेरे आणि अत्याधुनिक नियंत्रण कक्ष बांधण्यात आले आहेत.

PM Modi In Surat | Agrowon

इमारत 3000 कोटी रुपयांची

सुरत डायमंड बोर्सची इमारत सुमारे 3000 कोटी रुपयांची असून ज्यामध्ये 4,500 हिरे व्यापार कार्यालये आहेत. तर याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून नोंद झाली आहे.

PM Modi In Surat | Agrowon

जनतेचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले. त्यानंतर त्यांनी सुरतच्या जनतेचे अभिनंदन केलं. आज सुरत जगातील टॉप 10 शहरांमध्ये समाविष्ट झालं असून आधी सुरतला 'सन सिटी' म्हणून ओळख होती. आता मात्र इथल्या लोकांनी आपल्या मेहनतीने ते 'डायमंड सिटी' बनवल्याचे गौरवद्गार त्यांनी काढले.

PM Modi In Surat | Agrowon

पीएम मोदींचा रोड शो

सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केल्यानंतर पीएम मोदींनी सुरतमध्ये रोड शो केला. यावेळी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.

PM Modi In Surat | Agrowon
Sheep And Goat Management | Agrowon