PM Modi
PM ModiAgrowon

PM Modi : अयोध्या नगरीत पंतप्रधान मोदी यांचा 'रोड शो'

PM Modi reached at Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (३० रोजी) अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते अयोध्या नगरीत दाखल झाले असून त्यांचा 16 किलोमीटर रोडशो झाला.
Published on

Ayodhya News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (३० रोजी) अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते अयोध्या नगरीत दाखल झाले असून त्यांचा 16 किलोमीटर रोड शो झाला. त्यांच्या भव्य स्वागताची तयारीही करण्यात आली. यावेळी बनारसच्या डमरु दलाचे सदस्य आणि मथुराचे लोक कलाकारांनी त्यांच्या कलांचे सादरीकरण केले.

यावेळी पंतप्रधान मोदी हे नवीन नामकरण केलेल्या महर्षी वाल्मिकी विमानतळाच्या उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याहस्ते कोट्यवधींच्या योजना आणि प्रकल्पांचं लोकार्पण देखील पार पडणार आहे. तसेच मोदी मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षांचे गिफ्ट देताना जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडा दाखवतील. त्याचबरोबर अयोध्या धाम रेल्वे स्टेशन आणि अमृत भारत या योजनांचादेखील ते श्रीगणेशा करणार आहेत.

PM Modi
PM Modi In Surat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन

१४०० हून अधिक लोककलाकार

पंतप्रधान मोदी हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा तेथे 16 किलोमीटर रोडशो झाला आहे. यावेळी मोदी यांचे शंख, डमरू आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आले. त्यांच्या रोड शोच्या दरम्यान १४०० हून अधिक लोककलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. तसेच विमानतळ संमेलनस्थळी ३० लोककलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

PM Modi
PM Modi : विकासाच्या शत्रूंना नेस्तनाबूत करणे आवश्यक : पंतप्रधान मोदी

तगडा बंदोबस्त

पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यावरून तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. तर मोदींच्या 16 किलोमीटर रोडशो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यांच्या स्वागतासाठी कमानी करण्यात आल्या होत्या.

१५ हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ

अयोध्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसाठी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यात पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दोन नवीन अमृत भारत रेल्वे आणि सहा वंदे भारत रेल्वेंना झेंडा दाखविण्यासह अनेक रेल्वे प्रकल्प देशाला देणार आहेत. यासाठी १५ हजार ७०० कोटी रूपये देण्यात आले आहेत. तसेच अयोध्येच्या विकासासाठी सुमारे ११,१०० कोटी आणि आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांसाठी सुमारे ४,६०० कोटी रुपये देण्याची घोषणा मोदी करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com