Agriculture Commodity Market : सोयाबीन, हरभरा उतरले; हळद तेजीत

Agriculture Market : शेतीमालाच्या फ्यूचर्स व्यवहारांत अजूनही शासनाचे काहीच दूरगामी धोरण नाही हे या सूचनेवरून स्पष्ट झाले आहे.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon

फ्यूचर्स किमती : सप्ताह २ ते ८ मार्च २०२४

पाच मार्च रोजी NCDEX ने एक सूचना जाहीर केली. या सूचनेप्रमाणे यापुढे गूळ, भात व कॉफी यांचे नवीन व्यवहार सुरू होणार नाहीत. जे सुरू आहेत ते चालू राहतील. शेतीमालाच्या फ्यूचर्स व्यवहारांत अजूनही शासनाचे काहीच दूरगामी धोरण नाही हे या सूचनेवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतीमालाची बाजार व्यवस्था कधीच स्थिर होणार नाही.

हरभऱ्याची आवक आता वाढू लागली आहे. सोयाबीनच्या किमती घसरत आहेत. याला आंतरराष्ट्रीय परिस्थिती जबाबदार आहे. मागणी कमी व पुरवठा अधिक यामुळे १४ नोव्हेंबर पासून जागतिक किमती कमी होत आहे.

चीनकडून होणारी मागणी हा एक महत्वाचा घटक जागतिक किमती ठरवण्यासाठी समजाला जातो. गेल्या दोन महिन्यांत चीनची मागणी ८.८ टक्क्यांनी घसरून तिने २०१९ नंतरची नीचांकी पातळी गाठली आहे. ब्राझील व अर्जेंटिनामधील उत्पादनसुद्धा लवकरच बाजारात येईल. त्यामुळे किमती वाढण्यावर मर्यादा आहेत.

या सप्ताहात कापसाचे भाव १४.१ टक्क्यांनी, तर हळदीचे १.६ टक्क्याने वाढले. हळदीच्या जून फ्यूचर्सचे भाव स्पॉट भावाच्या तब्बल १९.४ टक्क्यानी अधिक आहेत. कांद्याचे भावसुद्धा वाढले आहेत.

८ मार्च २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

Agriculture Market
Agriculture Commodity Market : शेतीमाल व्यापारासाठी बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात रु. ६१,०६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ६१,३४० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव ५.९ टक्क्यांनी वाढून रु. ६४,९८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.९ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.१ टक्क्याने वाढून रु. १,५१५ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५९२ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ०.७ टक्क्याने कमी होऊन रु. २,२४० वर आले आहेत. फ्यूचर्स (एप्रिल) किमती रु. २,२२९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,२८७ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.७ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १५,१६५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्याने वाढून रु. १५,४१४ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ६.७ टक्क्यांनी वाढून रु. १८,०८६ वर आल्या आहेत. जून किमती रु. १८,४०४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १९.४ टक्क्यांनी जास्त आहेत. या तेजीचा अजूनही फायदा करून घेत येईल.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात १.७ टक्क्याने घसरून रु. ५,७७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक वाढत आहे.

Agriculture Market
Agriculture Commodity Market : कापूस, तूर, कांद्याच्या दरांत वाढ

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ९१५० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,६५९ वर आली होती. या सप्ताहात ती १.९ टक्क्याने घसरून रु. ४,५७० वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,६२० वर आली होती. या सप्ताहात ती ०.३ टक्क्याने घसरून रु. ९,५९५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,५३१ होती; या सप्ताहात ती रु. १,७५० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,५०० वर आली होती. या सप्ताहात ती रु. २,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com