Agriculture Commodity Market : शेतीमाल व्यापारासाठी बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड

BEAM Electronic Spot Platform : मुंबई स्टॉक एक्स्चेंजद्वारे बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड (BEAM) हा कृषी वस्तूंसाठी एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्म आहे. हे संपूर्ण भारतातील ई-ट्रेडिंग आणि लिलावासाठी उत्तम संधी आहे.
Agriculture Commodity
Agriculture CommodityAgrowon

BSE e-Agricultural Markets Limited : गोदाम उभारणी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहिती घेऊन गोदाम पुरवठा साखळीत आपले अस्तित्व निर्माण करून व्यवसाय उभारणी करावी याकरिता आपण काही लेखांमधून ऑनलाइन प्लॅटफॉर्मबाबत माहिती घेतली. परंतु या माहितीचा उपयोग क्षेत्रीय स्तरावर गोदाम पुरवठा साखळीत करणे अत्यंत आवश्यक आहे.

सीडीएसएल कमोडिटी रिपॉजिटरी लिमिटेड (CCRL) या प्लॅटफॉर्ममार्फत शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थांनी शेतीमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरू करणे गरजेचे आहे. सीडीएसएल कमोडिटी रिपॉजिटरी लिमिटेड ई-निगोशिएबल वेअरहाउस रिसिप्ट (eNWRs) शेतकऱ्यांना चांगल्या सौदेबाजीच्या अधिकारांसह तसेच खरेदीदारांना सुलभ ऑनलाइन शेतमाल

हस्तांतरासह देशभरात मोठ्या संख्येने असलेल्या खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. देशात कृषी उत्पादन हंगामी असून, शेतीमाल कापणी एका विशिष्ट हंगामात केली जाते, परंतु शेतीमालाची साठवणूक आणि व्यापार विविध पर्यायाद्वारे केला जातो.

सीडीएसएल कमोडिटी रिपॉजिटरी लिमिटेड मार्फत ई-निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट (eNWRs) शेतीमालाच्या प्रत्यक्ष हस्तांतरणाशिवाय एकापेक्षा अधिक वेळा मालकी हक्क हस्तांतर करण्यास सहकार्य करते.

सीसीआरलच्या माहिती तंत्रज्ञान (IT) विषयक पायाभूत सुविधा अत्यंत मजबूत आणि सुरक्षित असून सीसीआरलचे एकूण २३८ रेपॉसिटरी सहभागीदारांपैकी ९० हून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था रेपॉसिटरी सहभागीदार म्हणून कार्यरत आहेत.

देशातील वखार नियामक प्राधिकरणातर्गत नोंदणीकृत गोदामाच्या माध्यमातून ‘सीसीआरल’चे व्यवहार केले जातात. सीसीआरलकडे ३३ बॅक व नॅान बॅंक पॅनेलवर आहेत. ‘सीसीआरल’मार्फत ई-लिलाव प्लॅटफॉर्मशी संबंधित सेवा पुरविल्या जातात.

ई-लिलाव म्हणजे विक्रेते आणि बोलीदार (संभाव्य खरेदीदार) यांच्यातील व्यवहार जो इलेक्ट्रॉनिक मार्केटप्लेसवर होतो. ‘सीसीआरल''ने विविध प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने संपूर्ण भारतातील वस्तूंच्या ई-लिलाव सुविधांसाठी इलेक्ट्रॉनिक मार्केटप्लेस तयार केले असून, पारदर्शक ई-लिलाव प्रक्रियेद्वारे चांगली किंमत शोधणे हे ‘सीसीआरल’चे उद्दिष्ट आहे. यामध्ये बीम (BEAM) आणि ई-नाम यांचा समावेश होतो.

Agriculture Commodity
International Women's Day : कष्टाने माखलेल्या हाताचे बोल

‘बीम’वर ट्रेडिंग

‘बीम’वर व्यापार करणे खूप सोपे आहे

‘बीम’वर नोंदणी करा.

बीमवर बोली-लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हा.

खरेदीदाराला शेतीमाल मिळतो आणि विक्रेत्याला पैसे मिळतात.

‘बीम’ त्याच्या भागीदारांद्वारे साठवणूक, स्वच्छता, प्रतवारी इत्यादी सेवा आणि इतर बाजाराशी निगडित सेवा देणे याकरिता साह्य करते. ‘बीम''वरून ओली प्लॅटफॉर्मद्वारे शेतीमाल व स्टील याकरिता बाजाराशी निगडित दोन स्वतंत्र सेवा करून देण्यात येतात.

बीमद्वारे पिकाचा खरेदी व विक्री व्यवहार

तृणधान्ये आणि कडधान्ये : भात आणि तांदूळ, गहू, मका, चना, तूर, मूग, मसूर

तेल आणि तेलबिया : कापूस, मोहरी, सोयाबीन, भुईमूग, सोयाबीन तेल, मोहरीचे तेल, तंतू, कापूस, ताग, साखर सुका मेवा, मसाले आणि मसाले ः बदाम, काळी मिरी, हळद, जिरे, कोथिंबीर नाशिवंत फळे आणि भाज्या ः कांदा, बटाटा, टोमॅटो, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे, आंबा, केळी डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थ

‘बीम‘चे सभासद होण्‍यासाठी https://memregistration.bsebeam.com/Login.aspxया लिंकचा उपयोग करावा. अधिक माहितीसाठी https://www.bsebeam.com/index.html या संकेत स्थळास भेट द्यावी.

‘बीम''चे सभासदत्व घेतल्यामुळे समुदाय आधारित संस्था जसे की, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, महिला बचत गट यांना पर्यायी बाजारपेठ उभारण्यात सहकार्य मिळणार आहे. या संस्थांनी अभ्यासपूर्वक पद्धतीने माहिती घेणे अपेक्षित असून, या क्षेत्रात व्यवहार करण्याबाबत तत्काळ सुरवात करणे आवश्यक आहे.

आतापर्यंत माहिती दिलेल्या अनेक प्लॅटफॉर्मपैकी एका प्लॅटफॉर्म सोबत गोदाम उभारणी केलेल्या संस्थांनी कामकाज सुरू केले, तर थोड्याच दिवसात या विषयात कौशल्य प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. कौशल्य प्राप्त करणे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे,

त्यामुळे शासनाच्या विविध योजना घेऊन गोदामासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करणाऱ्या संस्थांनी या प्रक्रियेत तत्काळ उतरावे, ज्यामुळे काही दिवसांत एक बळकट व शाश्वत पर्यायी बाजारपेठ उभारणी शक्य होऊ शकेल. याकरिता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सहकार्य करू शकेल किंवा विविध प्लॅटफॉर्मच्या संकेतस्थळाला भेट देऊन प्रशिक्षणाची मागणी संस्था करू शकतात.

Agriculture Commodity
Agriculture Fund : लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी चारशे कोटींचे अनुदान वाटपासाठी धडपड

बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड

‘बीएसई‘ हे आशिया खंडातील सर्वांत जुने एक्स्चेंज आहे. बीएसईची स्थापना १८७५ मध्ये “बीएसई लिमिटेड” नावाने झाली. भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीत या एक्स्चेंजचे कार्य मोलाचे असून हा निर्देशांक जगभरात नावाजलेला आहे.

भारतातील छोट्या मोठ्या शहरात तसेच राष्ट्रीय पातळीवर या एक्स्चेंजच्या कार्याचा प्रसार झालेला आहे. जागतिक कीर्ती संपादन करून सर्वोत्तम स्टॉक एक्स्चेंज म्हणून नावारूपाला आलेल्या या एक्स्चेंजला सव्वाशे वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. विविध माहितीचे एकत्रीकरण, जोखीम नियंत्रण, तंत्रज्ञान पद्धती तसेच लोकांच्या संपत्तीची सुरक्षितता यासाठी BS७७९९ चे मानांकन असलेले लेखापरीक्षण केलेले हे भारतातील एकमेव व जगातील दुसरे एक्स्चेंज आहे.

मुंबई स्टॉक एक्स्चेंजद्वारे बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड (BEAM) हा कृषी वस्तूंसाठी एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्म आहे. हे संपूर्ण भारतातील ई-ट्रेडिंग आणि लिलावासाठी उत्तम संधी आहे.

पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार ‘सिंगल मार्केट’ तयार करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, पारदर्शक कमोडिटी स्पॉट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. उत्पादक, मध्यस्थ, सहायक सेवा आणि ग्राहक यांचा समावेश असलेल्या मूल्य साखळीमधील कृषी वस्तूंच्या व्यवहारांशी निगडित सेवा देण्यासाठी प्लॅटफॉर्मची मांडणी करण्यात आली. या प्लॅटफॉर्मने ११ डिसेंबर २०२० पासून कार्याला सुरुवात केली.

बीमने (BEAM) शेतकरी, व्यापारी आणि भागधारकांना विविध कृषिमालाची जोखीममुक्त खरेदी आणि विक्री सुलभ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे खरेदी आणि व्यापाराशी संबंधित अडथळे दूर करण्यात मदत मिळते.

बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड ही बीएसई इनव्हेस्टमेंट लिमिटेडची (BSE ची संपूर्ण मालकीची उपकंपनी) जगातील सर्वांत वेगवान स्टॉक एक्सचेंजची उपकंपनी आहे. बीएसईच्या या उपक्रमाचा उद्देश भारतीय कृषी बाजाराची स्पर्धात्मकता वाढवणे असून, वित्तीय बाजारपेठेतील बीएसईची ताकद आणि बाजार तंत्रज्ञान याचा फायदा कृषी क्षेत्राला मिळवून देणे हा आहे.

बीम (BEAM) शेतीमाल मूल्यसाखळी निर्मितीसाठी विद्यमान मूल्य साखळीतील सहभागी मध्यस्थाच्या भूमिकेत बदल करून कृषी बाजारांकरिता आधुनिक

पर्यायी बाजारपेठेसाठी वातावरण निर्मिती करीत आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,

एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com