Tomato Potato Rate : टोमॅटो, वांगी, बटाट्याची उसळी; कोंथिबिरीचा दर पडला

Vegetable Market : मेथी, लाल भाजी, कांदा पात, पालक १० रुपये पेंढी असा दर होता. हिरव्या मिरचीचा दर दोन महिन्यांनंतर किलोला २० रुपयांनी उतरून ६० वर आला.
Tomato Potato Rate
Tomato Potato RateAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Vegetable Market : सध्या चांगला पाऊस होत असल्याने भाजीपाला बाजारात टोमॅटो, वांगी, बटाट्याची आवक कमी झाली आहे. तर कोथिंबिरीच्या दरात अचानक घसरण झाली आहे. तसेच बीन्स आणि गवाारीच्या दरात कमालीची वाढ पहायला मिळत आहे.

भाजी मंडईत मुळ्याची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून पालेभाज्यांचे कमी झालेले दर कायम आहेत. फळबाजारात बंगळूर परिसरातून येणाऱ्या तोतापुरी आंब्याची वाढलेली आवक टिकून आहे.

महिनाभर स्‍थिर असणाऱ्या बटाट्याचे दर कमी आवकेने उसळले आहेत. क्विंटलमागे ३०० रुपयांनी दर वाढल्याने आठवडा बाजारातही ५ ते १० रुपयांनी किलोला दर वाढले आहेत. क्विंटलचा ३००० ते ३८०० रुपये असा दर झाला आहे.

किरकोळ बाजारात ३५ ते ५० रुपये विक्री सुरू होती. लसू‍ण दरातही वाढ असून १५००० ते २५००० रुपये क्विंटल तर १८० ते ३२० रुपये किलो असा दर होता. तुलनेत कांदा स्थिर असून २२ ते ४० रुपये किलो असा दर असल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. आले शिमोगा २०० रुपये किलो आहे.

भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक अधिक तर फळभाज्यांची कमी आहे. टोमॅटो, वांगी यांच्या दरात दहा किलोमागे १०० रुपयांनी वाढ आहे. कारली, दोडका, वांगी, ढब्बू, टोमॅटो यांचा घाऊक बाजारात दहा किलोचा दर ५०० रुपये होता.

बिन्सचा तोरा कायम असून किलोला सेंच्युरीचा दर कायम आहे. मेथी, लाल भाजी, कांदा पात, पालक १० रुपये पेंढी असा दर होता. हिरव्या मिरचीचा दर दोन महिन्यांनंतर किलोला २० रुपयांनी उतरून ६० वर आला.

Tomato Potato Rate
Soybean Crop Kolhapur : अस्मानी अन् सुलतानीच्या भीतीनं शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे फिरवली पाठ!

फळभाजारात केळीचे दर चढेच आहेत. वसई ४० ते ५० तर जवारी ७० ते ८० रुपये डझन दर आहे. सफरचंद, डाळिंब, मोसंबी १४० ते २०० रुपये किलो आहेत. तोतापुरी, अननस नगाला २० ते ३० रुपये दर आहे. स्थानिक यात्रांमुळे जवारी कोंबड्यांना मागणी आहे.

पेरूची नवी आवक

फळबाजारात देशी पेरूची नवी आवक सुरू झाली आहे. थायलंड म्हणून ओळखली जाणारी मोठ्या पेरूची आवक वर्षभर कायम होती. तुलनेत आकाराने लहान असणारे हे देशी पेरू चवीला गोड असल्याने मागणी होती. लगतच्या कर्नाटक, शिरोळ तालुक्यातून ही आवक होते. किलोला ६० रुपये असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com