Kolhapur Flower Market : कोल्हापूर बाजारात फुलांच्या दरात वाढ, फळांसह पालेभाज्यांचे दर काय ?

Flower Rate : दसऱ्यामुळे बाजारात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निशिगंध, झेंडू, गुलाब यांची विक्री जोरात सुरू असून दरातही वाढ झाली आहे.
Kolhapur Flower Market
Kolhapur Flower Marketagrowon
Published on
Updated on

Dussehra Flower Rate : दसऱ्यामुळे बाजारात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निशिगंध, झेंडू, गुलाब यांची विक्री जोरात सुरू असून दरातही वाढ झाली आहे. तसेच भाजीपाला बाजारात अद्याप मागणीचा जोर वाढला नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर बाजार समितीत नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे, मात्र आवक होणारा माल ओल्या स्वरूपात आहे. तसेच लिंबू आवक होत आहे परंतु फळ कच्चे येत आहे. मागणी नसल्याने पालेभाज्यांचे दर जैसे थे असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. फळबाजारात फळांची विक्री जोरदार सुरू आहे.

भाजीपाला

टोमॅटो- ६० ते ७०, दोडका-५० ते ६०, वांगी -६० ते ८०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ५० ते ६०, मिरची - ४० ते ५०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- २० ते ३०, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ५५ ते ६०, लसूण- ३५० ते ४००, आले- १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ७०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बीन्स- ६० ते ८०, गवार - १०० ते १२०, भेंडी- ६० ते ८०, देशी काकडी- ७० ते ८०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ३० ते ४०, भाज्या - १५ ते २० पेंढी, शेवगा - १० ते १२.

फुले

झेंडू - १५० ते १६०, निशिगंध - ५००, गुलाब - ५००, गलांडा - १०० ते १५०, शेवंती - २२० ते २५०, आष्टर - २५०.

फळे

सफरचंद - २२० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- ३०० ते ४००, चिकू- १०० ते १२०, पेरु - ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोर आवळा -१२० ते २००, सीताफळ - १५० ते २००, कलिंगड - ५० ते ६०, , केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - १०० ते १२० डझन, किवी - १६०, ड्रॅगन- १५० ते २००, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.

Kolhapur Flower Market
Gokul Dudh Sangh Kolhapur : गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; ११३ कोटी ६६ लाख रुपयांचा दूध फरक देणार

खाद्यतेल

सरकी - १४५ ते १५०, शेंगतेल - १९२ ते १९८, सोयाबीन - १४० ते १४५, पामतेल - १४० ते १४५, सूर्यफूल - १४० ते १४५.

कडधान्य

हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू - ३४ ते ४४, हरभराडाळ - ९३ ते ९६, तुरडाळ- १५० ते १६०, मुगडाळ -१०७ ते १३३, मसूरडाळ - ७७ ते ७८ , उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा- ८४ ते ८७, मूग-९२ ते १००, मटकी- ९५ ते १००, मसुर- ७० ते ७२, फुटाणाडाळ - ११० ते ११५, चवळी- ९५ ते १२५ , हिरवा वाटाणा- १७५, छोला -१२० ते १५०.

पिवळा जास्त, केसरी कमी

बाजारात सध्या पिवळ्या झेंडूची उपलब्धता जास्त आहे. केसरी झेंडूची आवक तुलनेने कमी दिसून येते. त्यामुळे केसरी झेंडूला डिमांड येणार असून, दर वाढण्याची शक्यता आहे. दसऱ्याला झेंडूला दर जादा राहील.,मात्र पावसामुळे बाहेरील आवक थांबल्यास दरावर परिणाम होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com