Parliament Monsoon Session : संविधान बचाववरून विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक

Save Constitution : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राज्यघटना बचावावरून विरोधकांनी सुरू केलेले आक्रमण १८ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतरही कायम राहिल्याचे सोमवारी (ता. २४) स्पष्ट झाले.
Parliament Session
Parliament SessionAgrowon

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राज्यघटना बचावावरून विरोधकांनी सुरू केलेले आक्रमण १८ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतरही कायम राहिल्याचे सोमवारी (ता. २४) स्पष्ट झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांत आधी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्या वेळी सुद्धा विरोधी पक्षांचे सदस्यांनी राज्यघटनेची प्रत हातात धरून संविधान बचावचा नारा देऊन विरोधक या मुद्यावर यापुढेही आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Parliament Session
Rahul Gandhi, Priyanka Gandhi : तेलंगणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया

१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. यापूर्वी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते भर्तुहरी महताब यांना सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी शपथ दिली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्रिमंडळातील इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.

याच वेळी राष्ट्रपतींनी हंगामी सदस्यांच्या पॅनेलवर काँग्रेसचे के. सुरेश, डीएमकेचे टी. आर. बालू, टीएमसीचे सुदीप बंडोपाध्याय व भाजपचे राधामोहन सिंग व फग्गन सिंग कुलस्ते यांच्या नावांना मंजुरी दिली.

सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष भर्तुहरी महताब यांनी राहुल गांधी यांनी वायनाड मतदार संघाच्या खासदारकीचा राजीनामा गेल्या १८ जूनला मंजूर केल्याचे स्पष्ट केले. यानंतर लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी नवनिर्वाचित सदस्यांची यादी पटलावर ठेवली. यानंतर काँग्रेसचे के. सुरेश यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला.

परंतु हंगामी अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ घेण्यासाठी पाचारण केले. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा सदस्य म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांनी हिंदीतून शपथ घेतली.

पंतप्रधान शपथ घेत असताना विरोधी पक्षांचे सदस्य राज्यघटनेची प्रत दाखवून निषेध व्यक्त करीत होते. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तेव्हासुद्धा विरोधकांनी संविधानाची प्रत दाखवून निषेध नोंदविला.

Parliament Session
Narendra Modi: बिगर-हमीभावाच्या 'त्या' 6 शिफारशींत नेमकं काय आहे?

बहिष्काराने सुरुवात

हंगामी अध्यक्षांच्या पॅनेलवर असलेल्या तीन सदस्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यास नकार दिला. भर्तुहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केल्याच्या निषेधार्थ के. सुरेश, टी. आर. बालू व सुदीप बंडोपाध्याय यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. या पॅनेलवर असलेल्या राधामोहन सिंग व फग्गन सिंग कुलस्ते या दोन भाजपच्या नेत्यांनी मात्र लोकसभा सदयत्वाची शपथ घेतली.

गडकरींची हिंदीतून शपथ

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेचे चौथे सदस्य म्हणून शपथ घेतली. गडकरी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी हिंदीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

तर केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे व केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मराठीतून शपथ घेतली. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी डोगरी भाषेतून शपथ घेतली. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी असामी भाषेतून शपथ घेतली. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कन्नड भाषेतून शपथ घेतली.

(ॲग्रो विशेष)

नीटच्या घोषणा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडीया भाषेतून शपथ घेतली. नीट परीक्षेवरून गोंधळ उडालेला असल्याने ते शपथ घ्यायला जात असताना विरोधी सदस्य नीट, नीट अशा घोषणा देत होते.

केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर अंदमान व निकोबारच्या सदस्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश अशा क्रमाने संबंधित राज्यातील सदस्यांनी शपथ घेतली.

पहिल्या रांगेत अवधेश प्रसाद

विरोधी पक्षांसाठी असलेल्या आसन व्यवस्थेमध्ये आज पहिल्या रांगेत राहुल गांधी, टीएमसीचे कल्याण बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह फैजाबाद (अयोध्या) येथून जिंकून आलेले सपाचे अवधेश प्रसाद बसलेले होते. फैजाबादमध्ये भाजपच्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव करून अवधेश प्रसाद प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com