President Droupadi Murmu : विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची ः राष्ट्रपती मुर्मू

President Murmu : गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
University of Gondwana : गडचिरोली : ‘‘देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी बुधवारी (ता.५) येथे केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते.

मुर्मू म्हणाल्या, ‘‘गोंडवाना विद्यापीठाच्या अथक परिश्रमातून स्थानिक आदिवासी, मागास घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. अतिशय कमी खर्चात उपलब्ध झालेल्या उपयुक्त शिक्षणातून याठिकाणी विद्यार्थी घडत आहेत.

या भागातील अनेक आदिवासी समूह राष्ट्रपती भवनात आपणास भेटण्यासाठी येतात. या घटकांकडून संपूर्ण देशाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून स्थानिक विकासाला चांगली चालना दिली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न व जिद्द कायम ठेवावी.’’

President Droupadi Murmu
Animal Reproduction : पशू पुनरुत्पादनामध्ये खनिजांची भूमिका महत्त्वाची...

‘‘विद्यापीठासाठी १७० एकरांवर येत्या काळात १५०० कोटी रुपये खर्चून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. विद्यापीठाने गेल्या १२ वर्षांत चांगली प्रगती केली आहे. ३९ टक्के आदिवासी लोकसंख्येच्या या जिल्ह्यात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे.

महाविद्यालयबाह्य विद्यार्थ्यांमध्ये या विद्यापीठाद्वारे शिक्षणाची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे,’’ असेही मुर्मू म्हणाल्या.

फडणवीस म्हणाले, ‘‘गडचिरोली जिल्हा हा जल, जंगल, जमीन आणि खनिज संपत्तीने समृद्ध आहे. या जिल्ह्यात उत्कृष्ट प्रकारचे लोहखनिज आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक येथे होत आहे.

गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, रेल्वे आदी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून येथे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.’’


‘गडचिरोलीत पायाभूत सुविधा उपलब्ध’
गडकरी म्हणाले, ‘‘गडचिरोली जिल्हा मागास, दुर्गम आहे. याचे कारण पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र आता रस्ते, उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी या जिल्ह्यासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत. रेल्वे, विमानतळ, लोहप्रकल्प यामुळे येथे गुंतवणूक वाढेल. या सर्व प्रक्रियेत गोंडवाना विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com