Livestock Census : नांदेडला एकविसाव्या पशुगनणेची तयारी सुरू

Department of Animal Husbandry : नांदेड जिल्ह्यात मे महिना ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान होणारी पशुगणना पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
Livestock Census
Livestock Census Agrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात एकविसाव्या पशुगणनेची तयारी पशुसंवर्धन विभागाकडून सुरू केली आहे. जिल्ह्यात मे महिना ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान होणारी पशुगणना पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी प्रगणकांचे प्रशिक्षणही झाले आहे. विसाव्या पशुगनणेनुसार जिल्ह्यात साडेअकरा लाख पशुधन असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी दिली.

जिल्ह्यात होणारी पशुगनणा ही जनगणनेनुसार संपूर्ण देशात केली जाते. पशुगणनेमधून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर पशुसंवर्धन योजनांची अंमलबजावणी केली जाते. देशात २०१८ मधील जुलैमध्ये पशुगणना होणार होती. परंतु पावसामुळे ती स्थगित करण्यात आली होती. आता मात्र पशुसंवर्धन विभागाने पशुगणना करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

Livestock Census
Livestock Registration : पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाइन नोंदणी करा

पशुगनणेमध्ये गायवर्ग, म्हैस वर्ग, मेंढ्या, शेळी, डुक्कर, घोडे, गाढव, उंट, कोंबड्या आदी पशूंची गनणा होणार आहे. ही पशुगणना करण्यासंदर्भात पहिले प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या मास्टर ट्रेनरना प्रत्येक जिल्ह्यात पाठवून तेथे पशुगणना करण्यासाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Livestock Census
Livestock Allocation Scheme : पशुधन वाटप योजनेचे जाचक निकष

या प्रगणकांना लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या प्रगणकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मे महिन्यात ही गणना सुरू होणार आहे. ती सप्टेंबरपर्यंत चालेल. ही गणना पहिल्यांदाच ऑनलाइन होणार आहे. प्रगणकाकडून जनावराचे पूर्ण विवरण लॅपटॉपमध्ये भरण्यात येणार आहे. यात प्रत्येक जनावरांची नोंद होणार आहे.

नांदेडला साडेअकरा लाख पशुधन नांदेड जिल्ह्यात २०१९ मध्ये करण्यात आलेल्या विसाव्या पशुगनणेत साडेअकरा लाख पशुधन पशुधन असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. यात गायवर्ग पाच लाख दोन हजार ४२८, म्हैस दोन लाख ३६ हजार ३८६, मेढ्या ७६ हजार ८९३, शेळ्या तीन लाख १८ हजार ५६४, डुक्कर सहा हजार ५२९, घोडे ४५७, गाढव चार हजार ६३४ अशा पशुधनाची संख्या असल्याची माहिती डॉ. घुले यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com