Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Soybean Rate : यंदा पावसाळ्यात पहिल्या दिवसापासून चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक जोमात आहे. मध्यंतरी काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सोडले, तर सोयाबीनचे चांगल्या उत्पादनाच्या आशा शेतकऱ्यांना आहेत.
Soybean Harvesting
Soybean Harvesting Agrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्यात सध्या सोयाबीन काढणीची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. यंदा सोयाबीनचे पीक चांगले असून, पावसामुळे पिकाची वाढही उंच झाली होती. यातच आकाशात परतीच्या पावसाचे ढग घोंघावत असल्याने सोयाबीन काढून मळणी करण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत.

मात्र उतारा कमी येत असल्याने सोयाबीनचे पीक केवळ उंचीने वाढले, त्याचे उत्पन्न वाढले नाही, असा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. यातच काढणीचे व मळणीचे भाव गगनाला भिडले असून, मजुरांकडून रोजंदारीऐवजी सोयाबीन काढणीचे काम गुत्त्याने घेण्याला प्राधान्य दिले जात आहे.

यंदा पावसाळ्यात पहिल्या दिवसापासून चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक जोमात आहे. मध्यंतरी काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सोडले, तर सोयाबीनचे चांगल्या उत्पादनाच्या आशा शेतकऱ्यांना आहेत.

यातूनच काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून, दुपारनंतर आकाशात पावसाचे ढग गोंघावत आहे. यामुळे हाताशी आलेले पीक मोठा पाऊस आल्यास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना असून सोयाबीनची काढणी करून लगेच मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची शिवारात धावपळ सुरू आहे.

Soybean Harvesting
Soybean Harvest : सोयाबीनसाठी हार्वेस्टर हा मर्यादित पर्याय

सोयाबीनच्या काढणीचे मजुरीचे दर विविध भागांत वेगवेगळे आहेत. एकरी साडेपाच हजारांपासून साडेसहा हजारापर्यंत मजुरी आहे. काही भागात हार्वेस्टरने सोयाबीन काढणी सुरू असून, हार्वेस्टरसाठी सोयाबीनचे पीक उभे असण्याची गरज आहे. काही भागात पावसामुळे सोयाबीनचे पीक आडवे झाल्यामुळे हार्वेस्टरने पीक काढणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

हार्वेस्टरच्या काढणीसाठी एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये भाव असून, हार्वेस्टरची संख्या कमी असल्याने अनेक शेतकरी पीक काढणीसाठी वेटींगवर आहेत. दुसरीकडे मजुरांकडून सोयाबीन काढणीसाठी रोजंदारीवर येण्यास नकार दिला जात असून मजूर गटागटाने सोयाबीन काढणीचे काम गुत्त्याने घेताना दिसत आहेत.

Soybean Harvesting
Soybean Harvesting : सोयाबीन कापणी, मळणी करताना काय काळजी घ्यावी?

या स्थितीत सोयाबीनचा उतारा मात्र, कमीच येत असून एकरी १५ ते १६ कट्टे उत्पन्न येत असून अतिवृष्टीने पाणी साचलेल्या क्षेत्रात एकरी सहा ते सात कट्टे उतार आहे. यामुळे यंदा सोयाबीन केवळ उंचीने वाढले होते, त्याच्या उत्पादनात वाढ नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांमध्ये ‘सावड’ वाढली

सोयाबीन काढणीचे भाव वाढले असतानाचा मळणीसाठीही कट्ट्याला दीडशे ते दोनशे रुपये आकारणी होत आहे. यामुळे किमान मजुरीचे पैसे तरी वाचवण्याची धडपड शेतकरी करत आहेत.

सोयाबीनचे कमी क्षेत्र असलेले शेतकरी एकमेकांच्या शेतात सोयाबीनची काढणी करून (सावड) मजुरीचे पैसे वाचवताना दिसत आहेत. हेच पैसे मळणीसाठी उपयोगी पडतात, असेही शेतकरी सांगत आहेत. सोयाबीनच्या चांगल्या उत्पन्नाच्या आशा असताना एकमेकांच्या शेतात सावडीने काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यंदा जास्त दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com