Crop Damage
Crop DamageAgrowon

Pre-Monsoon Rain : पावसाचा जोर कमी, तरी भीतीचे ढग कायम

Rain Crop Damage : गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसामुळे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
Published on

Nashik News : गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसामुळे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कांदा, आंबा डाळिंब भाजीपाला यासह रब्बी हंगामातील मका व बाजरीचे नुकसान आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र भीतीचे ढग कायम असल्याची स्थिती आहे.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा लागवडी अडचणीत सापडल्या होत्या. त्यामुळे रब्बी कांदा पीक उशिराने काढण्यासाठी आला. तर यंदा आंबा पिकाची काढणी सुरू असतानाच मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. लग्नसराई सुरू असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Crop Damage
Crop Damage Assistance: वादळी पावसामुळे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे १३ दिवसांमध्ये नुकसान

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने पुढील पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता १७ ते २१ मे दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुढील पाच दिवस वातावरण ढगाळ राहील असा अंदाज आहे. त्यामुळे या पावसाची धाकधूक कायम आहे. पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना पीक संरक्षण खर्च वाढला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. १५) झालेल्या पावसामुळे निफाड, सिन्नर, येवला तालुक्यांतील अनेक भागांत पावसाने पुन्हा दणका दिला. कांदा पिकाचे नुकसान दिवसेंदिवस वाढत असून यास वादळी वाऱ्यासह पावसामुळे वेलवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Crop Damage
Pre Monsoon Crop Damage: पावसाने २२ हजार हेक्टरवरील पिके बाधित

गुरुवारी (ता. १५) दुपारी येवला शहर परिसरात अर्ध्या तासासह अधिक वेळ मुसळधार पाऊस झाला. ग्रामीण भागातही कमी-अधिक पाऊस झाला असून, येथे पत्र्याच्या शेडखाली दावून एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

विजेच्या धक्क्य्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नळवाडी (ता. सिन्नर) येथील शेतकरी खातेदार रामदास दगडू सहाणे (वय ३५) यांचा शुक्रवारी (ता. १६) दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसमध्ये विजेच्या तारेचा धक्का बसून त्यांच्या मालकीच्या गटात असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com