Pre Monsoon Rain: पुण्यात मॉन्सूनपूर्व वादळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे पाणी ओसंडून वाहत आहे.
Heavy Rain Crop Damage
Heavy Rain Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे पाणी ओसंडून वाहत आहे. काही ठिकाणी पावसाचा जोरदार दणका देत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. शुक्रवारी (ता. १६) दुपारनंतर भोर, मुळशी, मावळ, वेल्हे, हवेली, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली.

मुळशी तालुक्यात जोरदार झालेल्या अवकाळी पावसामुळे भात खाचरे तुंबली आहेत. त्यामुळे पावसाळापूर्वीची शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली. तसेच जोरदार वाऱ्यामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Heavy Rain Crop Damage
Heavy Rain: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार; आंबा हंगाम संपुष्टात

शुक्रवारी सकाळपासून ऊन पडले होते. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. तर तीन वाजेनंतर ठिकठिकाणी ढग भरून आल्याने जोरदार पावसाला सुरुवात झाली. प्रामुख्याने मुळशी भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे भात खाचरे बऱ्यापैकी भरल्याने भात रोपवाटिकेच्या कांमांना वेग येणार असल्याची शक्यता आहे.

Heavy Rain Crop Damage
Pre monsoon Rain: माॅन्सूनचा मुक्काम अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारी भागात

भोर, सासवड, जेजुरी, लोणी काळभोर, उरूळीकांचन, वाघोली, शिक्रापूर, तळेगाव दाभाडे, राजगुरूनगर, घोडेगाव, नारायणगाव, चिंचोली अशा अनेक ठिकाणी सायंकाळी चार वाजेच्यादरम्यान पावसाने चांगलीच सुरुवात केली होती.

जोरदार वारे आणि पावसामुळे आंबा, जांभूळ, फणस फळांचे मोठे नुकसान झाले. हापूस, पायरी रायवळ आंब्याची झाडे उंच आहेत. जोरदार वाऱ्यामुळे अशा झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणावर पडली आहेत. आंबा उतरणी करणे, आढी घालून पिकवणे, मार्केटला पाठवणे पावसामुळे शक्य होणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com