Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवालात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव

Grape Export : संसदेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या निर्यातक्षम द्राक्ष शेतीचे कौतुक केले आहे.
Nashik Grapes Export
Nashik Grapes Exportagrowon
Published on
Updated on

Pune News : संसदेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या निर्यातक्षम द्राक्ष शेतीचे कौतुक केले आहे. तसेच, द्राक्षाचे अर्थकारण युवा शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीकडे आकर्षित करीत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक पाहणी अहलात देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील बदलाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात वाढत्या फलोत्पादनाचा उल्लेख आहे. ‘पारंपरिक शेतीपेक्षा फलोत्पादन अधिक उत्पादनशील व नफ्याचे ठरते आहे. त्यामुळे फलोत्पादन हा कृषी क्षेत्रातील झपाट्याने वाढणारा उद्योग बनतो आहे.

विशेष म्हणजे फलोत्पादनात आता भारत आघाडीचा निर्यातदार होतो आहे. २०२३-२४ मध्ये देशातून तीन हजार ४६० कोटी रुपयांची ३४३९८२ लाख टन द्राक्षे निर्यात झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व मिझोरम ही द्राक्ष उत्पादक राज्ये असून देशाच्या द्राक्षशेतीचे नेतृत्व महाराष्ट्र करतो आहे,’ असा गौरव या अहवालात केला गेला आहे.

Nashik Grapes Export
Budget 2025 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या योजनांचं कौतुक

आर्थिक पाहणी अहवालात नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. ‘नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांची उपजीविका द्राक्ष शेतीमुळे समृद्ध झाली आहे. कारण, येथील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षे पिकवून ती जागतिक बाजारात ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विकत देशी बाजारपेठेपेक्षाही चांगले भाव प्राप्त केले आहेत. त्यामुळे नवी पिढी द्राक्ष शेतीकडे झुकते आहे,’ असे निरीक्षण अहवालात नोंदविले गेले आहे.

Nashik Grapes Export
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातून मिळावा उद्योगाला दिलासा

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी शेती व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रांचा वापर केला. विशेषत: द्राक्ष शेतीत प्रत्यक्ष वेळेत नियंत्रण करणारी (रियल टाईम मॉनिटरिंग सिस्टिम) प्रणाली आणून दर्जेदार द्राक्ष उत्पादन केले आहे. सामूहिक कष्ट व तंत्रज्ञानावर आधारित निर्यातक्षम शेतीमधून एखाद्या प्रादेशिक भूभागातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा कसा कायापालट होतो हेच नाशिकच्या द्राक्षशेतीमधील यशोगाथेने दाखवून दिले आहे, असाही गौरवपूर्ण उल्लेख केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या अहवालात केला आहे.

भारताने गॅट करारावर स्वाक्षरी करताच देशातील सर्व पिकांमधील उत्पादकांना जागतिक स्पर्धेत उतरवणे व निर्यातीत प्रत्येक पिकाला आघाडीवर नेणे अपेक्षित होते. दुर्दैवाने तसे घडले नाही. मात्र, द्राक्षशेतीने ते काही प्रमाणात करून दाखविले. द्राक्षशेतीमधील तीन पिढ्या एकत्र राहून सामूहिक पद्धतीने समस्यांवर मात करीत प्रयोगशील शेती करीत आहेत. त्यामुळेच ही यशोगाथा तयार झाली. आता सरकारी व्यवस्थेने व कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्र येत चांगली धोरणे तयार केली तर समृद्ध शेतीची विकासगंगा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकते.
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म्स
आर्थिक पाहणी अहवालात द्राक्षशेतीचा झालेला उल्लेख ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. शेतकऱ्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी केंद्र सरकारने आता नव्या बाजारपेठांचे दरवाजे उघडून द्यावेत, नवनवीन वाण शेतकऱ्यांना द्यावेत, सर्व पिकांसाठी निर्यात धोरण सुटसुटीत करावे. हे झाल्यास सारे जग भारतीय फलोत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करेल.
-कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com