Roshan Talape
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांनी ९ वर्षे शत्रूंशी लढत स्वराज्याचे रक्षण केले.
लहानपणीच त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी आणि इंग्रजी भाषांचे शिक्षण घेतले. तसेच शिवाजी महाराजांकडून त्यांनी राजकारण, सैनिकी रणनीती आणि मुत्सद्देगिरी शिकली.
१६७४ मध्ये मोगलांविरुद्ध पहिले युद्ध जिंकले. औरंगजेबाच्या प्रचंड फौजेला सळो की पळो करत पराभवाची धूळ चारली तसेच पोर्तुगीज आणि सिद्दींवर वचक ठेवण्यासाठी अरबांशी मैत्री केली होती.
संभाजीराजे केवळ योद्धे नव्हते, तर कुशल राजकारणी देखील होते. त्यांनी मोगल आणि पोर्तुगीजांविरुद्ध एकत्रित रणनीती आखली आणि अंतर्गत शत्रूंना परतवून स्वराज्य एकसंध ठेवले.
संभाजीराजांनी आपल्या महाराणीला सर्वाधिकार दिले आणि राज्यातील आणि परराज्यातील महिलांवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली.
संभाजीराजे संस्कृत, हिंदी आणि मराठी भाषांवर प्रगती केली आणि 'कवीराज' म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 'बुधभूषण', 'नखशिख', 'नायिकाभेद' आणि 'सातसतक' हे महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले.
१६८१ मध्ये छत्रपतीपद स्वीकारून संभाजी महाराजांनी स्वराज्याला नवीन वैभव दिले. औरंगजेबाच्या प्रचंड सैन्यापुढेही त्यांनी कधी शरणागती पत्करली नाही.
संभाजीराजेंचा पराक्रम आणि साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देतं, आणि त्यांचे कार्य आपल्याला स्वाभिमान, संघर्ष आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते.