
Pune News: पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, बुधवारी (ता.२१) सायंकाळी, रात्री आणि गुरुवारी पहाटे जिल्ह्याच्या विविध भागांत झालेल्या पावसाने फळे, फुले आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला असला, तरी खरिपाच्या मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
बुधवारी (ता. २१) जिल्ह्यात पावसाने काढणीला आलेल्या बाजरीसह, गावरान आंबा, फुले आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. कुरुळी (ता. खेड) परिसरातील विविध गावांना अवकाळी पावसाने झोडपले. उन्हाळी हंगामातील बाजरी पिकांसह विविध पिकांचे फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांनी केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने दुतर्फा पाणी साठले होते. मोठ्या संख्येने वाहनांच्या दुतर्फा रंग लागल्याने प्रवासी यांना वाहतूक कोंडी सामना करावा लागला. दमदार पाऊस पडल्याने ओढे खळखळू लागले आहेत.दरम्यान आंबेगाव तालुक्यातील चासकरमळा-महाळुंगे पडवळ येथे वीज पडून सुनील बबन चासकर यांच्या कांदा चाळीला मंगळवारी (ता. २०) सायंकाळी आग लागली होती.
त्यात ३०० क्विंटल कांदा, २० पीव्हीसी पाइप, प्लॅस्टिकच्या आठ ताडपत्री, सागवान तुळई असा मुद्देमाल जळून गेला आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाच लाख ६७ हजार रुपये नुकसानीचा पंचनामा केला आहे.
शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळाली आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, बुधवारी दुपारपासून झालेल्या मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतीची मशागत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पावसामुळे वेळेत पेरणीस होण्याची शक्यता आहे. इंदापूर तालुक्यात नीरा नरसिंहपूर परिसरातील गावांत पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
गुरुवारी (ता. २२) सकाळी आठपर्यंत झालेला पाऊस
एनडीए १११
मगरपट्टा ८१.५
डुडूळगाव ६८
तळेगाव ढमढेरे ३९.५
पुरंदर ३९.५
राजगुरूनगर ३१.५
गिरीवन २७.५
हडपसर २४.५
तळेगाव २३.०
नारायणगाव २२.५
निमगीरी २१.५
माळीण २०.५
बारामती १७
हवेली १५
कोरेगांव पार्क १५
बल्लाळवाडी १३.५
लोणावळा १२.५
वडगाव शेरी ११.५
पाषाण ११.०
भोर ११.०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.