Pune Heavy Rain: पुण्यात ढगफुटीसदृश मॉन्सूनपूर्व पाऊस

Pre Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) दुपारपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने पुण्यासह, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, पुरंदर तालुक्यांना चांगलेच झोडपले.
Cloud Burst In Pune
Cloud Burst In PuneAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) दुपारपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने पुण्यासह, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, पुरंदर तालुक्यांना चांगलेच झोडपले. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत चिंचवड येथे १०१ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. अर्धा ते पाऊन तास झालेल्या पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्ते पाण्याखाली गेले. ग्रामीण भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

शहरासह जिल्ह्यात दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाषाण, बाणेर, कोथरूड, वारजे, चिंचवड, विश्रांतवाडी, हडपसर या भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे सर्व्हिस रस्त्यांसह महामार्ग आणि सोसायटी परिसरातील सते पाण्याखाली गेले, तर शहराच्या मध्यवर्ती भागात हलका पाऊस झाला. उपनगरात रस्ते पाण्याखाली गेले. रात्री अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने पुणे शहरासह उपनगराला झोडपले. सोसायटी, दुकाने आणि बैठी घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

Cloud Burst In Pune
Maharashtra Flood Relief Funds : अतिवृष्टी, पुरबाधित शेतजमिनीच्या मदतीसाठी ६ कोटींचा निधी मंजूर

घोडेगाव, मंचर (ता. आंबेगाव) व परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच दुकानापुढील फलक वादळामुळे रस्त्यावर उडून पडले होते. पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. तालुक्याच्या घोडेगाव, मंचर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. विद्युत पुरवठा खंडित झाला.

या परिसरात साचले पाणी

टिळक रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रोड, वेदभवन सर्व्हिस रोड, वारजे, आंबेगाव आणि बाणेर येथील सर्व्हिस रोड, अलका चौक, गुंजन चौक, सुखसागरनगर, कात्रज चौक, गांधी भवन, सुतारवाडी, एलएमडी चौक बावधन, वाघोली, खराडी, सिंहगड रोड, पायरी फाटा, नांदेड सीटी चौक यासह विश्रांतवाडी, येरवडा, हडपसर, कोरेगाव पार्क, औध या अन्य भागातही पाणी साचले.

पुणे-सातारा रोडवर नदीचे स्वरूप

पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी ते सारोळा परिसराला जोरदार पावसाने झोडपले. महामार्गावर आणि सेवा रस्त्यावर जागोजागी पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर हरिश्‍चंद्री येथे भुयारी मार्गाचे काम संत गतीने सुरू असल्याने साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर केळवडे गावच्या हद्दीत महामार्गावर डोंगरावरील पाण्याचे लोट आल्यामुळे महामार्गाला नदीचे रूप आले होते.

Cloud Burst In Pune
Heavy Rain Ahilyanagar : तीन दिवसांपासून अहिल्यानगरला जोरदार पाऊस

वीज पडल्याने कांदा बराकी खाक

महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील चासकर मळा येथील शेतकरी सुनील बबनराव चासकर यांच्या कांद्याच्या बराखीवर वीज पडून कांद्याची बराकी जळून खाक झाली आहे. सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यावेळी शेतकरी सुनील चासकर यांच्या कांद्याच्या बराकीवर वीज कोसळली. यात कांद्याची बराकी जळाल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

सरपंच सुजाता चासकर यांच्या घराच्या बाजूलाच बराखी असून बराखी जळाल्याचे लक्षात येतात सरपंच सुजाता चासकर, सचिन भाऊ चासकर यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांबरोबर आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. महसूल विभागाने नैसर्गिक आपत्ती म्हणून संबंधित शेतकऱ्याला आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे.

बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : चिंचवड १०१, तळेगाव ढमढेरे ८५, हडपसर ७६, डुडुळगाव ७०, वडगावशेरी ६७, एनडीए ६५, लोणावळा ५६, पाषाण ५४, हवेली ४९, लवासा ४९, तळेगाव दाभाडे ४४, गिरीवन ४२, शिवाजीनगर ४०, लव्हळे ३५, राजगुरुनगर २९, माळीण २८, कोरेगाव पार्क २८, नारायणगाव २८, पुरंदर १७, निमगिरी १२, बल्लाळवाडी ६, भोर ६, बारामती ५, दाडोपी ३.५, मगरपट्टा १, दौंड ०.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com