Crop Damage Estimate : १७ हजार ६४४ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज

Heavy Rain Crop Loss : मॉन्सून आणि मॉन्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यात शेतीचे मोठ नुकसान केले. १ मे ते ११ जूनपर्यंत तब्बल १७ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मॉन्सून आणि मॉन्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यात शेतीचे मोठ नुकसान केले. १ मे ते ११ जूनपर्यंत तब्बल १७ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये मे मध्ये झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या तब्बल १२,७१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

मराठवाड्यातील तब्बल २७ हजार १०३ शेतकऱ्यांना नुकसानीची झळ बसली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने यंदा चांगलाच कहर केला. गेल्या अनेक वर्षांत असा पाऊस पडला नसल्याचे शेतकरी सांगतात. प्रशासनाच्या माहितीनुसार संपूर्ण मे महिना व ११ जूनपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १ हजार २२७ गावांमधील तब्बल १७ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

यामध्ये १० हजार २२७ हेक्टरमधील बागायती, ५६५ हेक्टरमधील जिरायत क्षेत्रातील तर ६,८५१ हेक्टरमधील फळपिकांच्या झालेल्या नुकसानीचा समावेश आहे. महसूल विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यात १,०४७ गावातील १९,८५२ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली. त्यामध्ये १२ हजार ७१२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे.

Crop Damage
Crop Damage : सिंधुदुर्गात २६ हेक्टरवर नुकसान

यापैकी १९७५ हेक्टर फळपीक, १० हजार १७६ हेक्टर बागायती तर ५५९ हेक्टरवरील जिरायत क्षेत्रातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचा समावेश आहे. जूनमध्ये आतापर्यंत १८० गावांतील ७,२५१ शेतकऱ्यांच्या ४,९३२.०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ४,८७५ हेक्टर फळपिकांचे, ५१ हेक्टर बागायती तर ५.८२ हेक्टरवरील बाधित क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

Crop Damage
Crop Damage : हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ७६३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

६१३ पशुधन दगावले

माहितीनूसार मे पासून आतापर्यंत मराठवाडा विभागात ६१३ पशुधन दगावले आहे. यामध्ये १५५ लहान दुभती तर ३०१ मोठ्या दुभत्या पशुधनाचा समावेश आहे. तसेच ३१ लहान व १२६ मोठे ओढकाम करणारे पशुधनही नैसर्गिक आपत्तीत दगावले आहे.

३८ जणांचा मृत्यू

१ मे पासून आजपर्यंत वीज पडून, भिंत पडून अशा विविध घटनांत मराठवाड्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. तसेच ५१ जण जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला. जालना ७, परभणी, हिंगोली प्रत्येकी २, बीड ५, लातूर सहा, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com