Cotton Sowing: कापूस लागवडीत २० टक्क्यांची पंजाबमध्ये वाढ; सरकारकडून बियाण्यासाठी अनुदान

Punjab Farming Update: पंजाबमध्ये यंदा कापूस लागवडीत २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाब सरकारने बियाण्यावर ३३ टक्के अनुदान दिल्याने शेतकरी ३ वर्षांनंतर पुन्हा कापूस पिकाकडे वळत आहेत.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune News: पंजाबमध्ये यंदा कापूस लागवडीत २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाब सरकारने बियाण्यावर ३३ टक्के अनुदान दिल्याने शेतकरी ३ वर्षांनंतर पुन्हा कापूस पिकाकडे वळत आहेत. शेतकरी भाताऐवजी कापूस पिकाला प्राध्यान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

पंजाब कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदा १ लाख २९ हजार हेक्टवर कापूस लागवडीचे उद्दीष्ट होते. मात्र आतापर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ७८ टक्के लागवड पूर्ण झाली. पंजाबमध्ये आतापर्यंत १ लाख ६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड पूर्ण केली, असे पंजाब कृषी विभागाने स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्ष उद्दीष्टाच्या लागवड खूप अधिक होण्याची शक्यता आहे.

Cotton Farming
Cotton Sowing : कापसाच्या पेरणी क्षेत्रात ३५ हजार हेक्टरने घट

जास्त पाणी लागणाऱ्या भाताऐवजी शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे वळावे, यासाठी पंजाब सरकार मागील काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी पंजाब सरकारने इतर पिकांच्या बियाण्यावर अनुदानही जाहीर केले आहे. कापूस बियाण्यावरही ३३ टक्के अनुदान दिले जात आहे. पंजाब सरकारने यासाठी २० कोटी रुपयांची तरतूदही केली. सरकार अनुदान देत असल्याने शेतकरी कापूस पिकाला प्राधान्य देत आहेत.

सरकारकडे जवळपास ५० हजार शेतकऱ्यांनी अनुदानीत बियाण्यासाठी नोंदणी केली होती. त्यावरून राज्यात कापसाची लागवड गेल्यावर्षीपेक्षा किमान २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या हंगामात राज्यात २ लाख ४९ हजार हेक्टर कापूस क्षेत्र होते . ते यंदा २ लाख ९८ हजार हेक्टरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. 

Cotton Farming
Cotton Farming : वाण संशोधनातील वाव

कापूस उत्पाद राज्ये

पंजाबमधील केवळ ४ जिल्ह्यांमध्येच एकूण लागवडीच्या ९० टक्के क्षेत्र आहे. फाजिल्का, मनसा, बठिंडा आणि मुक्तसर जिल्ह्यांमध्ये कापसाची मोठी लागवड होते. आतापर्यंत लागवड झालेल्या १ लाख ६ हजार हेक्टरपैकी तब्बल ६० हजार हेक्टर क्षेत्र एकट्या फाजिल्का जिल्ह्यात आहे. 

हमीभावाचा परिणाम

सरकारने यंदा कापसाच्या हमीभावातही वाढ केली आहे. कापसाचा हमीभाव सरकारने ५८९ रुपयांनी वाढवला. देशात सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आता ८ हजार ११० रुपये झाला. तर मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ७ हजार ७१० रुपये करण्यात आला. कापसाचा हमीभाव ८ हजारांवर पोचल्यानेही शेतकरी कापूस पिकाकडे वळत आहे, असे काही कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com