Prahar Sanghatana Protest : छ. संभाजीनगरमध्ये प्रहार संघटना आक्रमक; बँकेच्या कार्यालयावर शेण फेकलं

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्ज मंजूर होऊनही बँक मॅनेजरने पैसै देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. याप्रकरणावरून प्रहार संघटनेनं आंदोलन केले. 
Prahar Sanghatana Protest
Prahar Sanghatana ProtestAgrowon

Pune News : छत्रपती संभाजीनगरमधील पिंपळखुटा गावातील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. यानंतर आता शनिवारी (ता. १) याचप्रकरणावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेनं इंडियन बँकेविरोधात आक्रमक पवित्रा घेत कार्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच बँकेच्या कार्यालयावर शेण फेकले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर शेत जमीन तारण ठेऊन शेतकरी विठ्ठल दाभाडे यांनी कर्ज काढले होते. मात्र मात्र बँक मॅनेजरने पैसै देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे निराश होऊन दाभाडे यांनी शेतात आत्महत्या केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमधील पिंपळखुटा गावातील शेतकरी विठ्ठल दाभाडे यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली. मयत दाभाडे यांनी शेत जमीन तारण ठेऊन इंडियन बँकेकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज मंजूर देखील झाले होते. मात्र वेळोवेळी पैसै मागून ही बँक मॅनेजरने पैसै देण्यास टाळाटाळ केली. तसेच कर्जाची रक्कम देण्यासाठी मॅनेजरने एजंटकडून लाच मागितली. यानंतर पैसे मंजूर होऊनही पैसे मिळत नसल्याच्या नैराश्येतून दाभाडे यांनी आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला होता. 

Prahar Sanghatana Protest
Vijay Wadettiwar : मर्जीतल्या कंपनीकडून मोबाइल खरेदीचा घाट : वडेट्टीवार

यानंतर शनिवारी प्रहार संघटनेने इंडियन बँकेविरोधात आक्रमक पवित्रा घेत शेंद्रा येथील कार्यालयाबाहेर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी कार्यालयावर शेण फेकत घोषणाबाजी केली. तर आत्महत्या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच मयत दाभाडे यांच्या कुटुंबियांना १५ दिवसाच्या आत मदत मिळावी, अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र जर ही मदत नाही मिळाली तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरावरही शेण फेकू असा इशाराही सरकारला दिला आहे. 

Prahar Sanghatana Protest
Vijay Wadettiwar : कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरीच सरकारची मस्ती उतरवतील : वडेट्टीवार

पैसे देण्यासाठी टाळाटाळ 

मे महिना संपला असून खरीपाच्या पेरणीचे वेध शेतकऱ्यांना लागले आहेत. मात्र खिशात पैसे नाहीत, सरकारने घोषित केलेल्या दुष्काळी अनुदानाचा पत्ता नाही अशी अवस्था राज्यात दिसत आहे. तर मागील खरीप हंगामातील पिक विमा मंजूर झाला असतानाही त्याचे पैसे देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करत आहेत. 

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा घणाघात 

दरम्यान पिंपळखुंटा येथील शेतकरी आत्महत्येवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी (ता. ३०) राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच  महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com