Vijay Wadettiwar : कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरीच सरकारची मस्ती उतरवतील : वडेट्टीवार

Cotton, Onion, Soybeans : राज्यातील शेतकरी हा निसर्गाच्या लहरीपणामुळे हताश झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांना पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने तो निराश होत आहे. यावर कोणतही तोडगा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार काढत नाही. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कापूस, कांदा आणि सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. यामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातल्यापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी उचलत आहेत. कापसाचे देखील काही वेगळे नाही. नको त्या जाचक अटी सरकारने लादल्या आहेत. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शिंदे सरकारसह केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ही टीका रविवारी (१८ रोजी) पत्रकार परिषदेत नागपूर येथे केली. कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी सरकारची मस्ती उतरवल्या शिवाय राहणार नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन

देशाची राजधानी दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन चिरडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे. तर आपल्या पिकाला योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. त्यांना टोमॅटोच्या बॉक्समध्ये कांदा निर्यात करावा लागत आहे. अशी वेळ या सरकारने शेतकऱ्यांवर आणल्याची टीका, वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : मर्जीतल्या कंपनीकडून मोबाइल खरेदीचा घाट : वडेट्टीवार

एमएसपीच्या नावावर लूट

एमएसपीच्या नावावर क्विंटल मागे लूट सुरू असून कापसावर सरकारकडून जाचक अटी लादल्या गेल्या आहेत. त्यांच्या या जाचक अटींमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनाम नुकसान होत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या याच धोरणामुळे कापूस खरेदी सेंटरवरून शेतकऱ्यांना ट्रक परत न्यावे लागत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

भाजपवाले काहीही म्हणू शकतात

याचबरोबर दिल्लीत सुरू असणाऱ्या आंदोलनावरून वडेट्टीवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हे सरकार गोळीबार (छरे) करत आहे. भाजप शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणत असून यानंतर त्यांचा उल्लेख आतंकवादी म्हणून करेल. भाजपवाले काहीही म्हणू शकतात. असे अत्याचारी सरकार इतिहासात पहिल्यांदाच पाहत असून या सरकारला अन्नदात्याचे श्राप नक्कीच लागेल असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे

Vijay Wadettiwar
Cotton Rate : कापूस भावात तेजीचे संकेत

तसेच वडेट्टीवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा हा श्रापच भाजपची सत्ता उध्वस्त करण्याचं काम करेल. येणाऱ्या लोकसभेत भाजपला त्यांची जागा शेतकरी राजाच दाखवले असेही ते म्हणाले.

उद्योगपतींचे चोचले सरकार पुरवतयं

यावेळी वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भावना आहे असे हे राज्यातील शिंदे सरकार म्हणते. मात्र शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचे काम सध्या सुरू आहे. हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ज्यांच्या भरोशावर हे जगत आहेत. त्याच शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे पाप हे सरकार करत आहे. उद्योगपतींचे चोचले पुरवले जात असून गरिबांना पायदळी तुडवण्याचा काम या सरकारकडून सुरू आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com