Electricity Meter : विद्युत मीटर नेण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देणे अनिवार्य

Power Supply Disconnection : ग्राहकाचे विद्युत मीटर काढून नेण्यापूर्वी ‘महावितरण’कडून त्याला पूर्वसूचना अथवा नोटीस देणे आवश्यक आहे. विद्युत जोडणी ही अत्यावश्यक सुविधा असून, महावितरणने केलेली कार्यवाही ग्राहकाची गैरसोय करणारी आहे,
Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon
Published on
Updated on

Pune News : ग्राहकाचे विद्युत मीटर काढून नेण्यापूर्वी ‘महावितरण’कडून त्याला पूर्वसूचना अथवा नोटीस देणे आवश्यक आहे. विद्युत जोडणी ही अत्यावश्यक सुविधा असून, महावितरणने केलेली कार्यवाही ग्राहकाची गैरसोय करणारी आहे, असे नमूद करीत ग्राहकाचा ४८ तासांच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले.

विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर तक्रारदाराने बिले नियमित भरावीत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मुभा महावितरण कंपनीस राहील, असेही आयोगाने निकालात नमूद केले.

अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्या प्रणाली सांवत व कांचन गंगाधरे यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. याप्रकरणी योगेश रमेश देशमुख यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.

त्यांच्या वडिलांनी २००३ मध्ये घरगुती वापरासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमार्फत वीजमीटर घेतला. २००३ पासून ५०० ते ८०० रुपये वीजबिल येत होते. तर, ४८ तासांच्या आत विद्युतपुरवठा सुरळीत करा २०२३ पासून २५० किंवा १७९ रुपये वीजबिल येत गेले. या दरम्यान, त्यांनी सर्व बिले भरली.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : वीज दिवसाआड, पिकांचे होतेय चिपाड

मात्र फेब्रुवारी २०२४ मध्ये तक्रारदारांना कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देता विद्युत कंपनीने त्यांचे मीटर काढून नेले, वा नंतर कार्यालयात गेल्यानंतर थेट १२ लाख ३ हजार ६९० रुपयांचे बिल देत ते तीन हप्तांमध्ये भरण्यास सांगितले. मात्र तक्रारदारांना ही रक्कम मान्य नसल्याने त्यांनी अॅड. लक्ष्मण जाधव यांच्या मार्फत ग्राहक आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. या वेळी आयोगाने तक्रारदाराच्या अंतरिम अर्जावर आदेश जारी केला.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचा ‘शॉक’

बारा लाख रुपयांचा ‘महावितरण’ने केलेला खुलासा

तक्रारदारांच्या विद्युत मीटरचे रीडिंग घेण्याकरिता कर्मचारी घरी गेले असता त्यांना मीटर रीडिंग घेणे शक्य झाले नाही. यासाठी तक्रारदारांचे असहकार्य जबाबदार असल्यामुळे त्यांना तक्रार करता येणार नाही. वीज मीटर दर्शनी भागामध्ये तसेच रीडिंग घेता येईल, अशा पद्धतीने बसविण्याबाबत कळवूनसुद्धा त्यांनी पूर्तता केली नाही.

त्यांना जून २०१९ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत सरासरी पद्धतीने वीजबिले देण्यात आली. मात्र जानेवारी २०२४ मध्ये प्रत्यक्ष मोटर रीडिंग प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांनी वापरलेल्या युनिटप्रमाणे त्यांना १२ लाख ३ हजार ६९० रुपयांचे वीजबिल देण्यात आले. याखेरीज, तक्रारदाराने विद्युत चोरी केली असून त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com