Amla Food Processing : आवळ्यापासून चूर्ण, लोणचे, सुपारी

Amla Foods : आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा कॅण्डी, मुरंबा, लोणचे, सुपारी, चूर्ण, ज्यूस, चटणी, सरबत, गुलकंद, बर्फी असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते.
Amla Foods
Amla FoodsAgrowon
Published on
Updated on

कृष्णा काळे, राणी दुपडे

Amla Fruit : आवळा फळ चवीला जास्त तुरट असल्यामुळे ताजा आवळा खाणे अवघड जाते. याकरिता आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा कॅण्डी, मुरंबा, लोणचे, सुपारी, चूर्ण, ज्यूस, चटणी, सरबत, गुलकंद, बर्फी असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते. आवळा हा पाचक, ज्वरनाशक, दात मजबुतीसाठी उपयुक्त असतो. केसाच्या आरोग्य चांगले राखण्यासाठीही गुणकारी आहे. त्यामुळे आवळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Amla Foods
Amla Processing : आवळ्यापासून जॅम, गर, सरबत

आवळा चूर्ण

एक किलो आवळ्याच्या फोडी १० ते १५ मिनिटे वाफवून घ्याव्यात. त्यानंतर या फोडी थंड करून घ्याव्यात. या फोडी ३ ते ४ दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यावेत. आवळ्याच्या फोड्या चांगल्या वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून चूर्ण तयार करून घ्यावे. तयार चूर्ण निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरून साठवून ठेवावे.

Amla Foods
Food Processing Industry : खाद्य निर्मिती छंदाचे झाले उद्योगात रूपांतर

लोणचे

एक किलो आवळ्याचे तुकडे घ्यावेत. हे तुकडे १५० ग्रॅम मिठामध्ये मिसळून २२ ते २४ तासांसाठी भिजत ठेवावे. त्यानंतर आवळ्याचे तुकडे द्रावणाच्या बाहेर काढून त्यात ३० ग्रॅम मेथी बिया, ४०० मिलि मोहरीचे तेल घालून मिसळून घ्यावे. हे मसाला गरम केल्यानंतर आवळ्याच्या तुकड्यामध्ये मिसळावा. तयार मिश्रणात २ टक्के हिंग घालावे. त्यानंतर दोन दिवसांनी २५ ग्रॅम मीठ मिसळावे घ्यावे. तयार लोणचे बाटलीत भरून हवाबंद करावे.

आवळा सुपारी

एक किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. आवळ्याचे तुकडे करून १०० अंश सेल्सिअस तापमानाला ६ ते ७ मिनिटे शिजवून घ्यावेत. या पद्धतीमुळे आवळा सुपारीचे टिकवण क्षमता वाढते. त्यानंतर आवळ्याचे तुकडे गरम पाण्यातून काढून थंड करून घ्यावेत. या फोडींमध्ये ५० ग्रॅम मीठ मिसळून घ्यावे. त्यामध्ये ३ ग्रॅम काळेमीठ आणि ५ ग्रॅम आमचूर पावडर मिसळून घ्यावे. त्या मिश्रणाला ड्रायरमध्ये ६० ते ७० अंश सेल्सिअस तापमानाला ५ ते ६ तासासाठी वाळवावे. त्यानंतर तयार झालेल्या आवळा सुपारीला थंड करून पॉलिथिन पाऊचमध्ये पॅक करून ठेवावे. तयार आवळा सुपारी ३ महिने चांगली राहते.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया विषयातील तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com