Solar Village India: ‘पोफळा’ मराठवाड्यातील पहिले सौर ऊर्जा ग्राम

Rural Solar Energy Project: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव मराठवाड्यातील पहिले संपूर्ण सौर ऊर्जा ग्राम बनले आहे. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि.च्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारलेली ही क्रांती आता ऊर्जेतील स्वावलंबनाचे प्रतीक ठरत आहे.
Rural Solar Energy Project
Rural Solar Energy ProjectAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: पर्यावरण संवर्धनासाठी कार्बन उत्सर्जन शून्य करून अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे. या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करून फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव संपूर्ण सौरग्राम केले आहे. संपूर्ण गाव सौर ऊर्जेद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे, असे हे मराठवाड्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

समुद्रसपाटीपासून ७२५ मीटर उंचावर फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे तसे लहानसे गाव. गावात अवघा ७७ उंबरठा. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे गाव संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्याचे ठरवले. त्यासाठी ‘महावितरण’ने त्यांना सहयोग दिला. महावितरणने या गावाचा अधिभार नियमित करण्यासाठी १०० केव्हीचे रोहित्र बसवून दिले. त्यामुळे वीज पुरवठा पूर्णवेळ सुरू राहू शकतो.

Rural Solar Energy Project
Solar Village: मंत्रालयातील ३३ अधिकारी सौरग्राम टेकवडीच्या दौऱ्यावर

गावाने एक होऊन संपूर्ण वीज चोरी बंद केली. त्यानंतर ग्रीड पुरवठा पद्धतीने प्रत्येक घरावर १ केव्ही क्षमतेचे सौर पॅनेल बसविण्यात आले. त्यासाठी प्रति पॅनेल, फिटिंग, मीटर बसविणे असा प्रत्येक कुटुंबासाठी ५१ हजारांचा खर्च कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केला. एप्रिलपासून संपूर्ण गाव हे सौर ऊर्जेवर शिफ्ट झाले, अशी माहिती एन्ड्युरन्सच्या सामाजिक उपक्रम विभागाचे सहायक व्यवस्थापक उदय दुधगावकर यांनी दिली.

Rural Solar Energy Project
Solar Project : मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात आणखी ५ सौर ऊर्जा प्रकल्प सुरू

या शिवाय गावातील शाळा, जलसंधारण, वृक्ष लागवड अशी इतर कामेही या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून झाली आहेत.संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर आल्यामुळे गावातील वीजचोरी पूर्ण बंद झाली. शिवाय प्रत्येक सौर पॅनेलबरोबर घरावर वीज अटकाव यंत्रे, अर्थिंगही लावण्यात आली. पोफळा गाव संपूर्ण सौरग्राम असल्याला महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दुजोरा दिला आहे.

दिवसा १२,७२५ कृषिपंपांना वीज

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १२ हजार ७२५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत असल्याची माहिती महावितरण कडून प्राप्त झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com