Manmad APMC : मनमाड बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा ‘लिलाव बंद’ मागे

APMC News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार शुल्क एक रुपयावरून ७५ पैसे करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांची होती.
Manmad APMC
Manmad APMC Agrowon
Published on
Updated on

Nashik News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार शुल्क एक रुपयावरून ७५ पैसे करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांची होती. मात्र बाजार समितीने आर्थिक स्थितीनुसार बाजार शुल्क ९० पैसे आकारण्याचा प्रस्ताव दिला.

त्यावर मागणी मान्य न झाल्याने सांगत व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत लिलाव बंद पुकारला होता. अखेर मंगळवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत हा बंद मागे घेण्यात आला आहे. बुधवारपासून (ता. १५) बाजार आवारात लिलाव पूर्ववत झाले.

सभापती दीपक गोगड यांनी बाजार समिती व व्यापारी यांना विचारात घेऊन १ रुपया असलेले शुल्क १० पैशांनी कमी करून ९० पैसे केले होते. मान्य ७५ पैसे असावे या मागणीवर व्यापारी ठाम होते. त्यानुसार सोमवारी (ता. १३) पत्र देत मंगळवारपासून (ता. १४) आडमुठी भूमिका घेत थेट लिलाव बंद पुकारला. या घोषणेमुळे शेतकरी वर्गाची कोंडी होणार होती.

Manmad APMC
APMC Fee Dispute : मनमाड बाजार समिती शुल्कावरून बेमुदत बंद

सभापती दीपक गोगड यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती कार्यालयात झालेल्या बैठकीला संचालक मंडळ आणि व्यापारी उपस्थित होते. बाजार समितीने शुल्क ७५ पैशांवरून एक रुपया केली होती. त्यामुळे फी कमी करून ७५ पैसे करावी ही मागणी व्यापाऱ्यांनी केली होती.

११ जानेवारी रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत आर्थिक परिस्थितीचा विचार करून व व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेता पहिल्या टप्प्यात सदरचे बाजार शुल्क ९० पैसे केले होते, मात्र व्यापाऱ्यांनी मागणीवर ठाम राहत सोमवरी बाजार समितीच्या लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र दिले होते.

Manmad APMC
Sangli APMC : सांगली फळ मार्केटमधील ५६ व्यापाऱ्यांना फेरनोटीस

त्यामुळे बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी सभापती दीपक गोगड यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र बैठकीत समिती फी ७५ पैसे करण्यावर व्यापारी ठाम असल्याने आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व गैरसोयीचा विचार करून मधला मार्ग काढत बाजार फी ८५ पैसे करण्यावर एकमत झाल्याचे गोगड यांनी सांगितले.

निर्णय हा बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर केला जाईल व एप्रिलमध्येदेखील बाजार फी आणखी कमी करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिल्यानंतर पुकारलेला संप मागे घेण्यात आल्याचे गोगड यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारपासून (ता. १५) बाजार समितीत लिलाव पूर्ववत सुरू झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com