Beed Controversy: राजकीय नाट्य शिगेला! धस-मुंडे भेटीवरून विरोधक आक्रमक

Political Betrayal: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील गुप्त भेटीनंतर धस यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे.
Suresh Dhas and Dhananjay Munde
Suresh Dhas and Dhananjay MundeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील गुप्त भेटीनंतर धस यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने तब्बल साडेचार तास ही भेट झाली. मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो असे सांगत सारवासराव करण्याचा प्रयत्न केला.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांना घेरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भेटीनंतर हा प्रकार अतिशय किळसवाणा आहे. सुरेश धस कधी ना कधी पलटी मारणार याची मला खात्री होती. धस यांना हृदय आहे की नाही, ते इतके कसे निर्दयी राजकारणी आहेत, असा घणाघात त्यांनी समाज माध्यमातून केला आहे.

Suresh Dhas and Dhananjay Munde
Suresh Dhas : सुरेश धस यांचा गौप्यस्फोट; पीकविम्यात कोट्यावधींचा घोटाळ्यात मुंडेंचा हात? कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे एकच आहेत. धस यांनी देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला आहे, अशा शब्दांत हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील अन्य विषयांवरून मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात नाव न घेता गंभीर आरोप केले होते. तसेच ‘आका’ असा उल्लेख करत मुंडे यांच्यासह कराड याच्यावरही गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. धस यांनी अनेकदा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली होती. दरम्यान, या आठवड्यात चार-पाच दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत होते.

Suresh Dhas and Dhananjay Munde
Maharashtra Politics: गृह विभागाच्या लक्तरांना ‘अण्णां’चे ठिगळ

मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना या दोन्ही नेत्यांची आपल्या घरी जेवणानिमित्त भेट झाल्याचे सांगत ही चर्चा साडेचार तास चालल्याचे सांगून टाकले. यावर सारवासारव करताना, आपण केवळ अर्धा तास भेटलो असे सांगून धस यांनी साडेचार तास भेटलो नसल्याचे सांगत ‘बावनकुळे यांनाच तुम्ही विचारा,’ असे सांगून अडचणीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

फडणवीसांचा विश्वास गमावत आहेत : अंधारे

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट हा बीडच्या जनतेचा विश्वासघात आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये ते पोलिसांना माफ करा असे सांगत आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची भेट घेत आहेत. ते स्वतःसह देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा विश्वासार्हता गमावत आहेत, अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com