POCRA
POCRAAgrowon

POCRA Scheme : शेतीमाल विक्रीसाठी शासन प्रयत्नशील कृषिमंत्री कोकाटे : ‘पोकरा’ टप्पा-२ कार्यशाळा, आढावा बैठक

Manikrao Kokate : हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब करून संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे, पाण्याचा कार्यक्षमतेने वापर वाढविण्यासाठी उपायोजना करणे व कृषी मालाची मूल्यसाखळी वाढविणे हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ योजनेचा उद्देश आहे.
Published on

Agriculture Market : नाशिक : हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब करून  संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे, पाण्याचा कार्यक्षमतेने वापर वाढविण्यासाठी उपायोजना करणे व कृषी मालाची मूल्यसाखळी वाढविणे हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ योजनेचा उद्देश आहे.

शेतकरी सक्षमीकरणासह येणाऱ्या काळात शेतमालाची विक्री व्यवस्था सुद्धा मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. सिन्नर (जि.नाशिक) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ कार्यशाळा व आढावा बैठकीत ते बोलत होते.

POCRA
POCRA Scheme : ‘पोकरा -२’मध्ये हवी पारदर्शकता

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, ‘आत्मा’''चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड, पाणी फाउंडेशनचे राजेश हिवरे यांच्यासह अधिकारी, गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

कोकाटे म्हणाले, की राज्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेले काम उल्लेखनीय असून लोकसहभागतून या प्रकल्पास निश्चितच गती मिळणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याठी  प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचनाही कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी कृषी अधिकारी नाठे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा अंतर्गत झालेले कामांचा आढावा या वेळी सादर केला. पाणी फाउंडेशनचे श्री.हिवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आमले व तालुका यांनीही मनोगत व्यक्त केले.

‘सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा’
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ साठी जागतिक बँकेने निकषांनुसार विकासावर आधारीत गावांची निवड केली आहे.या सूवर्णसंधीचा गावांनी फायदा करून घेतला पाहिजे. ग्रामस्थांनी त्यांची शेती चांगल्या प्रकारे कशी विकसित कशी होईल यासाठी एकत्र येवून लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी करावयाचा आहे.प्रकल्पासाठी गावपातळीवर ग्राम कृषिविकास समितीने सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा,असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com