Solar Scheme
Solar SchemeAgrowon

Surya Ghar Yojana : ‘सूर्यघर मोफत वीज योजने’तून ७८ हजार रुपयांचे अनुदान

Solar Scheme : प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार असून, वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.
Published on

Solapur News : ‘पंतप्रधान-सूर्यघर मोफत वीज योजने’त तीन किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार असून, वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची वेगाने अंमलबजावणी करण्याची सूचना महावितरणला केली आहे. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून, सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते, अर्थात वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते, असेही चंद्र यांनी सांगितले.

Solar Scheme
Solar Energy : बुलडाण्यात २ हजार ग्राहक झाले वीज निर्माते

...अशी आहे योजना आणि अनुदानाची पद्धत

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर अधिक एक किलोवॉट म्हणजे तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॉटला अठरा हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल.

Solar Scheme
Solar Power Project : प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध

अर्थात, एक किलोवॉटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली, तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रति ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.

इथे करा अर्ज

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाइल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केली आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com