PM-KISAN Scam Alert: पीएम किसान योजनेच्या बनावट लिंकचा सापळा: शेतकऱ्यांनी घ्यावी दक्षता!

Fake PM Kisan Links: पीएम किसान योजनेशी संबंधित बनावट लिंकद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम चोरली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा मेसेजवरील लिंक्स उघडू नयेत आणि फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार द्यावी.
Cyber Scam Alert
Cyber Scam AlertAgrowon
Published on
Updated on

Solapur News: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या मोबाइलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप या मॅसेजची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम चोरटे परस्पर काढून घेत आहेत. शेतकऱ्यांनी अशा फसव्या पीएम किसान ॲप्लिकेशनपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

Cyber Scam Alert
PM Kisan : शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांनी मोबाइलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप या संदेशाची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.

Cyber Scam Alert
PM Kisan :धाराशिवमध्ये पीएम शेतकरी सन्मान योजनेत ३,७२६ लाभार्थ्यांची भर

मोबाइलवर ‘पीएम किसान लिस्ट एपीके’ (PM Kisan list. APK) किंवा ‘पीएम किसान एपीके’(PM Kisan APK) अशा लिंक येत आहेत. चोरटे अशा लिंक मुद्दामहून शेतकऱ्यांच्या विविध ग्रुपवर पाठवत आहेत. परिणामी फोन हॅकिंग, माहितीची आणि आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत.

सायबर चोरट्यांनी एपीके (अँड्रॉईड पॅकेज किट) लिंक पाठवत ती उघडणाऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम लांबवण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशी फसव्या लिंक ओळखून त्यापासून सावध राहावे.
रवींद्र माने, जिल्हा कृषी अधिकारी, धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com