Sugarcane Cultivation : सांगलीत उसाची ८२ हजार हेक्टरवर लागवड

Sugarcane Season : पूर्व हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली असून सुरू हंगामातील ऊसलागवड करण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता पाहूनच शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. पूर्व हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली असून सुरू हंगामातील ऊसलागवड करण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार २०३ हेक्टरवर ऊसलागवड झाली आहे. मात्र पाणीटंचाईमुळे पूर्व आणि सुरू हंगामातील ऊसलागवड करण्यासाठी शेतकरी सावध पावले टाकत आहेत.

जिल्ह्यातील वाळवा, मिरज, कडेगाव आणि पलूस तालुक्यांत आडसाली हंगामातील ऊसलागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तर दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी या तालुक्यांत सुरू आणि पूर्व हंगामातील उसाच्या लागवडीसाठी शेतकरी पुढे येतात. कृष्णा आणि वारणा नदीच्या काठच्या गावात मे महिन्यापासून आडसाली उसलागवड केली जाते.

परंतु यंदा वळीव पावसाने दडी मारली. त्यातच उशिरा पाऊस सुरू झाला. त्यामुळे या पट्ट्यातील उसलागवड लांबणीवर पडली होती. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने ऊस लागवडीस गती आली. परंतु कमीअधिक पाऊस असल्याने पाण्याची उपलब्धता पाहूनच शेतकऱ्यांनी लागवड केली.

Sugarcane
Sugarcane Cultivation : नव्या ऊस लागणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी

दुष्काळी पट्ट्यात परतीचा पाऊस पडतो. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या आवर्तनावर ऊसलागवड अवलंबून असते. मात्र, यंदा अपुरा पाऊस पडल्याने कोयना धरणही पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्याचा परिमाण सिंचन योजनांच्या आवर्तनावर झाला आहे. त्यामुळे पूर्व आणि सुरू हंगामातील लागवडीस फारशी गती आली नाही.

Sugarcane
Sugarcane Cultivation : शहादा तालुक्यात ऊस लागवड स्थिर

आटपाडी तालुक्यात उसाची लागवड सर्वांत कमी झाली असल्याचे चित्र आहे. वाळवा तालुक्यात १४ हजार ९५४ हेक्टरवर आडसाली उसाची लागवड झाली आहे. यंदा ऊस लागवड घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

हंगामनिहाय ऊसलागवड (क्षेत्र हेक्टरमध्ये)

आडसाली ३७,१९८

पूर्व हंगाम १३,२२५

सुरू हंगाम ५,१३८

खोडवा २६,६४३

तालुकानिहाय

ऊसलागवड दृष्टीक्षेप

तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज २०४०७

जत २५९३

खानापूर ९४८२

वाळवा १६९४३

तासगाव ९९३९

शिराळा ४९०७

आटपाडी १७९

कवठेमहांकाळ २३५१

पलूस ९७३७

कडेगाव ५६६५

एकूण ८२२०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com