Central Warehouse Corporation : केंद्रीय वखार महामंडळाचे नियोजन

Article by Milind Aakre, Hemant Jagtap : गोदाम पुरवठा साखळीतील इतर अनेक शासकीय यंत्रणांपैकी केंद्रीय वखार महामंडळ भविष्यातील गोदाम व्यवस्थापनातील गरजा ओळखून नवनवीन बदल करीत आहे.
Central Warehousing Corporation
Central Warehousing Corporation Agrowon

Planning of Central Wakhar Corporation : ग्राहकांची गरज आणि आवड निवड वारंवार बदलत असल्याने गोदामाच्या उभारणीच्या पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. महामंडळामार्फत गोदामांच्या उभारणीसाठी नवनवीन डिझाईनचा शोध घेण्यात येत आहे. यामुळे गोदामातील साठवणुकीत वेगळेपण आणता येऊ शकते. हे सर्व इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान, वित्त, मार्केटिंग, ग्राहक सेवा आणि ग्राहकांचा अभिप्राय यांच्याशी निगडित प्रश्न यावर संशोधन करून त्यावरून गोदामाचे डिझाईन तयार करता येऊ शकते.

या डिझाईनमुळे गोदामाची उत्पादकता वाढविता येऊ शकते, मालाची साठवणूक व्यवस्थापन आणि वाहतूक यामध्ये लवचिकता आणता येऊ शकते. यापुढील काळात गोदाम सेवा पुरवठादार एजन्सी वेळेचे बंधन पाळून त्यानुसार व्यवसायाच्या उत्पनाबाबत नियोजन करेल.

महामंडळामार्फत उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या गोदामांच्या व्यवस्थापनात बदल करून नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या बदलांचे अनुकरण शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था त्यांच्या प्रगतीसाठी करतील, जेणेकरून केंद्रीय वखार महामंडळासारखा गोदाम व्यवसायात यशस्वी व्यवसाय या संस्था करू शकतील.

महामंडळाचे व्हीजन २०२५

केंद्रीय वखार महामंडळाने सन २०२५ पर्यन्त वखार महामंडळाच्या प्रगतीच्या दृष्टीने रणनीती तयार केलेली आहे. त्यातील काही घटकांची आपण माहिती घेतली आहे. समाजाच्या दृष्टीने सुरक्षित गोदाम व्यवस्थापन, पर्यावरणास अनुकूल, विश्वसनीय, किफायतशीर, मूल्यवर्धन करणारी गोदाम व्यवस्था याबरोबरच एकीकृत गोदाम आणि लॉजेस्टिक सुविधा निर्माण करून ग्राहकांना समाधानकारक गोदामविषयक सेवा पुरविणे असा उद्देश ठेवून केंद्रीय वखार महामंडळाने व्हीजन २०२५ ची निर्मिती केली आहे.

साठवणूक क्षमतेचा विस्तार, प्रगती, डिजिटायझेशन आणि गोदाम व्यवस्थापनातील सोप्या प्रक्रिया याद्वारे व्यापारात वाढ करणे.

शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी साठवणूक प्रक्रियेत शेतकरी वर्गास सामावून घेणे, वैज्ञानिक साठवणूकीबाबत प्रशिक्षण देणे, साठवणुकीत किडे व इतर गोष्टींपासून धान्यांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक रसायनांचा उपयोग करणे.

सन २०२०-२-२५ च्या उपाययोजनांमध्ये गोदामातील रिकाम्या जागांचा कौशल्यपूर्ण उपयोग करून नवीन साठवणूक क्षमतेबाबत उपाययोजना करणे.

वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) यांच्यामार्फतमान्यताप्राप्त गोदामांची कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा उपबाजार स्वरूपात स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी गोदाम आधारित कृषी उत्पादनांची बाजारपेठ निर्माण करणे, शितगृहांमध्ये विविधता आणणे, स्वच्छता, प्रतवारी व पॅकेजिंग इत्यादी सेवांची निर्मिती करून शेतमालाचे मूल्यवर्धन करणाऱ्या सुविधा पुरविणे.

भारत सरकारच्या आदेशानुसार व गोदाम क्षेत्रातील व्यवसायातील बदलांशी निगडित महामंडळाने पारंपरिक धान्य साठवणूकीपासून इतर आधुनिक गोदामविषयक सुविधा जसे की कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी व मल्टिमोडल पार्कची निर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

लॉजीस्टिक पार्क. स्तर-१ व स्तर-२ शहरांमध्ये ई-कॉमर्स गोदाम विषयक व्यवसाय विस्तार, वैयक्तिक गुंतवणुकीतून शीतगृह साखळीची निर्मिती, विशिष्ट वस्तूंच्या खरेदीसाठी कंपनी आणि शासन यांच्यात मध्यस्थाची भूमिकेच्या स्वरूपात कामकाज करणे. सोबतच परिवहन व्यवसाय म्हणजेच रस्ते व रेल्वे या दोन्ही पर्यायांच्या साहाय्याने उद्योगास चालना देणे.

Central Warehousing Corporation
Central Warehousing Corporation : सेंट्रल वेअर हाउसिंग कॉर्पोरेशनतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा

अंतर्गत नियंत्रण प्रणाली

केंद्रीय वखार महामंडळ व्यापाराच्या सुलभ व कौशल्यपूर्ण व्यवस्थापनासाठी अंतर्गत नियंत्रण प्रणाली आणि प्रक्रियेचे बळकटीकरण व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश याचा अंतर्भाव करणार आहे. यामध्ये डिजिटायझेशनच्या माध्यमातून एमआयएसद्वारे संपूर्ण माहितीचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. यापुढील काळात सदर माहितीच्या आधारे गोदाम व्यवसायाची शेतकरी वर्गाच्या व इतर ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने उपयुक्तता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महामंडळाचे कामकाज

केंद्रीय वखार महामंडळाची संपूर्ण भारतात सुमारे ४६५ हून अधिक गोदामांची साखळी असून गोदामविषयक विविध सेवा दिल्या जातात. दुर्गम भागात गोदाम विषयक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर पूर्व क्षेत्रातील केंद्र शासित प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि अंदमान निकोबार द्वीप समूह अशा एकूण चार ठिकाणांवर १६७०४ टन क्षमतेच्या गोदामांची निर्मिती करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळासोबत केंद्रीय वखार महामंडळाने करारावर सह्या केल्या आहेत.

महामंडळाकडे विविध मालाच्या साठवणुकीच्या सेवा उपलब्ध असून भारतीय अन्न महामंडळ, नाफेड, भारतीय कापूस महामंडळ, राज्य नागरिक पुरवठा महामंडळ, खते उत्पादक कंपन्या, इ-कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्यात येत असून औद्योगिक वस्तू, किराणामाल, कृषी गोदामांमध्ये धान्य साठवणूक इत्यादी मालाचे संरक्षण करणाऱ्या प्रशिक्षित व अनुभवी मनुष्यबळाद्वारे पेस्ट कंट्रोलच्या सेवा सुद्धा पुरविण्यात येतात.

महामंडळाच्या ग्राहकांचे व्यापक नेटवर्क असून प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळाच्या साहाय्याने वैज्ञानिक साठवणुकीच्या सेवा महामंडळामार्फत पुरविण्यात येतात. महामंडळाने सन २०२२-२३ मध्ये १३.६४ लाख वर्ग फूट नवीन साठवणूक क्षमता निर्माण केली असून सुमारे १०६.०९ कोटी रुपयांची वैयक्तिक/खासगी गुंतवणूक महामंडळाने आकर्षित केली आहे.

केंद्रीय वखार महामंडळ फक्त गोदामात साठवणूक करणे एवढ्यावरच थांबणार नसून मूल्यवर्धित सेवांवर लक्ष केंद्रित करून एक आदर्श निर्माण करणार आहे. तथापि सद्यःस्थितीत महामंडळ संपूर्ण व्यापार क्षेत्र जसे की, कृषी गोदाम व्यवस्थापन, औद्योगिक गोदाम व्यवस्थापन, निर्यात संबंधित केंद्र इत्यादींचे बळकटीकरण करून व्यवसाय वाढीमध्ये नवीन उपाययोजना करून भविष्यातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी रणनीती तयार करीत आहे.

Central Warehousing Corporation
Warehouse Corporation : वखार आपल्या दारी’अंतर्गत बारा जिल्ह्यांत कार्यशाळा

व्यवसायाशी संबंधित जोखीम

केंद्रीय वखार महामंडळामार्फत व्यावसायिक तथा आर्थिक जोखमीवर मात करण्यासाठी राज्य, विभाग व क्षेत्रीय स्तरावर जोखीम व्यवस्थापन समित्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या समित्याद्वारे महामंडळ जोखीम विषयक मूल्यमापन व संनियंत्रण केले जाते. यामुळे कुशलतेने जोखीमीवर मात केली जाते.

लघु व सूक्ष्म उद्योगांकडून खरेदी

केंद्रीय वखार महामंडळाकडून स्टार्ट अप्सला चलन देण्याच्या अनुषंगाने लघु व सूक्ष्म उद्योगांकडून आवश्यक साहित्य व सुविधांची खरेदी केली जाते. महामंडळ कोणत्याही साहित्याची खरेदी करताना लघु व सूक्ष्म उद्योगांना निविदा प्रक्रियेमध्ये २५ टक्के आरक्षण दिले जाते. त्यापैकी ४ टक्के अनुसूचित जाती व जमातीशी निगडित उद्योगांना व ३ टक्के महिलांशी निगडित उद्योगांना प्राधान्य दिले जाते.

या रणनीतीनुसार सन २०२२-२३ मध्ये महामंडळाने एमएसईमार्फत ४००.४७ कोटी रुपयांची खरेदी केली असून वर्षाच्या एकूण खरेदीच्या (८०४.३१ कोटी) तुलनेत ४९.७९ टक्के आहे. अनुसूचित जाती व जमातीशी निगडित उद्योगाकडून ३३.६८ कोटी रुपयांची खरेदी केली असून एकूण खरेदीच्या ही खरेदी ४.१९ टक्के असून महिलांशी निगडित एमएसईकडून ४३.९१ कोटी रुपयांची खरेदी केली असून ही खरेदी एकूण खरेदीच्या ५.४६ टक्के आहे.

महामंडळामार्फत एमएसई विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ०२.०२.२०२० मध्ये इनवॉईसमार्ट (ट्रेडस लिमिटेड) च्या माध्यमातून ट्रेडस रेसीव्हेबल डिसकाउंटिंग सिस्टम (टिआरईडीएस) प्लॅटफॉर्म वर स्वत:ला नोंदणीकृत करून घेतले असून या माध्यमातून एमएसई उद्योगांना देयक अदा केले जाते.

टिआरईडीएस ही उद्योजकांसाठी एक प्रणाली असून हा प्लॅटफॉर्म अनेक आर्थिक वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांशी जोडलेला आहे. हा प्लॅटफॉर्म अनेक कॉर्पोरेट खरेदीदारांशी एमएसई उद्योगांकरिता साहित्याच्या देयकात सूट देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात टिआरईडीएस या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून वस्तू आणि सेवा खरेदीसाठी १०० टक्के व्यवहार करण्यात आले आहेत.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर

डिजिटायझेशन शिवाय कोणत्याही व्यवसायाच्या प्रगतीला पर्याय नाही हे ओळखून केंद्रीय वखार महामंडळ त्यांच्या पारंपरिक गोदाम व्यवस्थापन प्रणालीच्या डिझाईनमध्ये आवश्यकतेनुसार नव्या गरजांच्या अनुषंगाने बदल घडविण्याचे नियोजन करीत आहे. या बदलामुळे स्थळ, कामगार, उपकरणे, कामकाज, वस्तूंचा स्रोत व प्रवाह इत्यादी सर्व गोदामाशी निगडित अंतर्गत व्यवस्थापनात बदल करण्यात येणार आहे,

जेणेकरून साठवणूक केलेला माल योग्य रीतीने बाजारात आणणे सोईस्कर होईल. या व्यतिरिक्त गोदामांची उत्पादकता वाढविण्यासाठी व कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी मालाची नोंदणी करण्याची उत्तम उपकरणे, बारकोडिंग, आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन), आरएफसीएस (रेडिओ फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन सिस्टम), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स/ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इत्यादीचे प्रयोग करण्यात येत आहेत.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com