Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Cropping Pattern : पावसाची उशिरा सुरुवात व अपुरी मात्रा, पीक वाढीच्या कालावधीत ३ ते ५ आठवड्यांचा पावसाचा खंड हे बदलत्या हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतीत उपयुक्त तंत्र वापरुन शाश्वत उत्पादन मिळविता येते.
Crop Management
Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

Rainfed Agriculture : महाराष्ट्रात जवळपास ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाची सरासरी ७५९ मी. मी. पेक्षा कमी असलेला भाग म्हणजे अवर्षण प्रवण क्षेत्र. ज्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर व धारशिव जिल्ह्यातील बरेचसे क्षेत्र येते. तर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भाग निश्चित पावसाच्या प्रदेशात येतो. पावसाची उशिरा सुरुवात व अपुरी मात्रा, पीक वाढीच्या कालावधीत ३ ते ५ आठवड्यांचा पावसाचा खंड हे बदलत्या हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतीत उपयुक्त तंत्र वापरुन शाश्वत उत्पादन मिळविता येते.

नैसर्गिक घटक जसे जमिन, पाणी, सुर्यप्रकाश व हवा इत्यादींचा कार्यक्षम उपयोग करुन घेण्यासाठी जमीन व्यवस्थापन आणि पीक पद्धतीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यामध्ये  

पेरणीपुर्वी मशागत, आंतरमशागत, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण व पीक संरक्षणाबरोबर शेत पातळीवर जलसंधारणाकरिता परिस्थितीनुरुप योग्य अशा मुलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा. 

मृद व जलसंधारण करण्याकरिता बांध बंदिस्ती, ओघळ व नाल्यासह व इतर उपचाराची निगा व दुरुस्ती पावसाळ्यापुर्वीच करावी. 

Crop Management
Dryland Crop Management : पावसानुसार कोरडवाहू पिकांचे नियोजन

जमीन व पाऊसमानानुसार पीक पद्धतीची निवड करुन ठेवावी. 

मध्यम ते भारी जमीनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत. 

हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीकरिता दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये मूग, रब्बी ज्वारी, संकरीत ज्वारी, सोयाबीन ही पिके घ्यावीत. 

मध्यम जमिनीत सुर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत. तर हलक्या जिमिनीत बाजरी, कुळीथ, यासारखी पिके घ्यावीत. 

पेरणीसाठी लवकर येणाऱ्या वाणाची निवड करावी. बीज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. बियाण्याचे योग्य प्रमाण ठेवावे. 

रोपांची योग्य संख्या ठेवावी. त्याकरीता पिकांच्या दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर शिफारशीनूसार ठेवावे. 

अन्नद्रव्ये, तण, कीड आणि रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन ठेवावे. आवश्यकतेनूसार रासायनिक, कीडनाशकांचा आणि तण नाशकांचा वापर करावा. आवश्यकतेनूसार आपत्कालीन पीक नियोजन करावे. अशा प्रकारे कोरडवाहू क्षेत्रात पीकाचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकेल.  

माहिती आणि संशोधन - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com