Dryland Crop Management : पावसानुसार कोरडवाहू पिकांचे नियोजन

Koradvahu Sheti : पाऊस आणि जमिनीच्या प्रकारानुसार मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीन, तूर, कापूस, खरीप ज्वारी, मूग, उडीद लागवड करावी. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन आणि हलक्या जमिनीमध्ये बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी, भगर लागवड करावी.
Dryland Crop Management
Dryland Crop ManagementAgrowon

डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ.आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके

Dry Land Update : कोरडवाहू शेतीतील हेक्टरी उत्पादन वाढविणे, प्रतिकूल वातावरणात उत्पादन चांगले मिळणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने पिकाच्या मूलस्थानी पाणी जिरविण्याचे तंत्र, आंतरपीक पद्धती आणि दुबार पीक पद्धतीमध्ये खत आणि पाण्याचे व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत योग्य पिके आणि पीक पद्धती, खरीप हंगामासाठी फायदेशीर पीक पद्धती तसेच विहीर व कूपनलिका पुनर्भरण आणि शेततळ्याद्वारे संरक्षित सिंचनाच्या शिफारशी केलेल्या आहेत.

१) मराठवाडा विभागामध्ये पावसाची सुरवात वेळेवर आणि त्यानंतर पावसाचा खंड, पावसाची सुरवात उशिरा आणि पावसामध्ये खंड, पावसाची अनियमितता आणि पीक वाढीच्या कालावधीमध्ये मोठा खंड दिसून येतो. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणीचे नियोजन बदल करावा लागतो.

२) जिरायती पिकाची पेरणी १०० मि. मी. पाऊस झाल्यावर लगेच करून घ्यावी. भारी जमिनीमध्ये सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, कापूस लागवड करावी. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये सूर्यफूल, मटकी, कारळा, तीळ, ज्वारी लागवड करावी.

३) योग्य पाऊस होताच (७५ ते १०० मि.मी.) पेरणी करावी. पेरणी बरोबर रासायनिक खताची मात्रा द्यावी.

Dryland Crop Management
Dryland Farming : कोरडवाहू शेतीत हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान अंगीकारा

४) पाऊस उशिरा सुरु झाल्यास आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा.

५) पेरणीपूर्व मशागत, बीजप्रक्रिया, आंतरमशागत एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण आणि एकात्मिक पीक संरक्षण यांचा अवलंब करावा.

६) मूलस्थानी जलसंधारणा करिता रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करावी.

७) पूर्वमशागत करीत असताना शिफारशीनुसार शेणखताचा वापर करावा.

८) मृद व जलसंधारणाकरीता बांधबंदिस्ती, ओघळ नाले इतर उपचाराची दुरुस्ती करावी.

९) जास्त पाऊस झाल्यास शेतात साचलेले पाणी लवकरात लवकर शेताबाहेर काढावे.

१०) पाऊस झाल्यानंतर तीन दिवसांनी वखर पाळी देऊन पेरणी करावी. जेणेकरून उगवत्या तणाचा बंदोबस्त करणे शक्य होते.

पीक व्यवस्थापन :

१) जमीन, पाऊसमानानुसार पीक पद्धती निवडावी.

२) मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीन, तूर, कापूस, खरीप ज्वारी, मूग, उडीद याचा समावेश करावा.

३) हमखास पाऊस असलेल्या क्षेत्रात दुबार पीक पध्दतीचा अवलंब करावा.

४) मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन लागवड करावी.

५) हलक्या जमिनीमध्ये बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी, भगर लागवड करावी.

६) आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. त्यामध्ये सोयाबीन + तूर (४:२), कापूस + सोयाबीन/ मूग/उडीद (१:१), बाजरी + तूर (४:२) किंवा (३:३), एरंडी + भुईमूग, तूर + तीळ (२:४),ज्वारी + तूर (३:१) किंवा (२:१), कापूस + तूर (६:१), या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा.

७) पाऊस खंडाच्या काळात कोळपणी करावी. त्यामुळे उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन होण्यास मदत होते. तसेच तण नियंत्रणासोबत जमीन भुसभुशीत होऊन भेगा बुजल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. काडी-कचरा आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवनकमी होण्यास मदत होते. काडी-कचरा, ज्वारीचे धसकटे, वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे.

८) रोपाची विरळणी करून जमिनीतील अन्न आणि पाणी याची बचत करावी. त्यामुळे झाडांची योग्य संख्या राखली जाते. दोन ओळी आणि दोन झाडांत योग्य आंतर ठेवावे.

९) पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी पिकास सरी आड पद्धतीने पाणी द्यावे. शक्य असेल तर फवारा सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

१०) लवकर येणाऱ्या जातीचा अवलंब करावा. बियाण्याचे प्रमाण प्रती हेक्टरी योग्य ठेवावे. बीज प्रक्रियेचा अवलंब करावा.

११) शेणखत, रासायनिक खताचा वापर, जिवाणू संवर्धन बीजप्रक्रिया यांचा अधिक उत्पादनासाठी अवलंब करावा. ५० ते ७५ टक्के रासायनिक खताबरोबर २५ ते ५० टक्के शेणखताचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारतात.

१२) जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी. पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरुन पिकांना फायदा होईल.

१३) पेरणीसाठी प्रमाणित बियाणांचा वापर करावा. सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचे बियाणे तीन वर्षापर्यंत वापरता येते.

Dryland Crop Management
Maharudra Manganale: कोरडवाहू शेती म्हणजे पालथा धंदा पण तरी आमची शेती आनंददायी...

पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन :

अ.क्र.---पेरणीयोग्य पावसाचा आगमन कालावधी---कोणती पिके घ्यावीत---कोणती पिके घेवू नयेत

१---१५ जून ते ३० जून---सर्व खरीप पिके

२---१ जूलै ते ७ जूलै---सर्व खरीप पिके

३--- ८ जूलै ते १५ जूलै ----कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तूर, मका, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, एरंडी. आंतरपीक पद्धती : बाजरी + तूर (४:२), सोयाबीन + तूर (४:२), कापूस + मूग (१:१)--- भुईमूग, मूग, उडीद

४----१६ जूलै ते ३१ जूलै----सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी, कारळा, हुलगा ----संकरित कापूस, ज्वारी, भुईमूग

५ १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट----संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी + तीळ, एरंडी + तूर, एरंडी + धने------- कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन

जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन

अ.क्र.---जमिनीची खोली---उपलब्ध ओलावा मि.मी.---पीक नियोजन

१---७.५ सें.मी. पेक्षा कमी---१५ ते २०---गवत, वनशेती

२---७.५ सें.मी. ते २२.५ सें.मी.---३० ते ३५---हुलगा, मटकी, एरंडी, वनशेती, बाजरी + तूर, बाजरी + मटकी/ हुलगा (२:१)

३---२२.५ सें.मी. ते ४५ सें.मी.---४० ते ६०--- सलग सूर्यफूल, बाजरी, तूर, बाजरी + तूर (२:१)

४---४५ सें.मी. ते ९० सें.मी. ---९० ते ११०---बाजरी + तूर (२:१), कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी

जिरायती विभागासाठी शिफारशीत जाती

अ.क्र.---पीक --- जाती

१---ज्वारी ---परभणी शक्ती, (पीव्हीके १००९), सीएसएच-१४, सीएसएच-१६, सीएसएच-२५, सीएसएच-१६४१,

२---बाजरी---पीकेव्ही राज, एएचबी १२००, एएचबी १६६६, शांती, फुले महाशक्ती, सुधारित जाती ः पीपीसी-६, अेबीपीसी-४-३, धनशक्ती

३---कापूस---देशी कापूसः पीए-७४०, पीअे-५२८, पीऐ-४०२,,, सुधारीत अमेरिकन कापूस ः एन..६१५, एन.एच-५४५,,, संकरित अमेरिकन कापूस ः बी.टी. कापूस : एन.एच.एच.-४४,

४---सोयाबीन---जेएस-३३५, एमएयूएस-७१, एमएयूएस-१५८, एमएयूएस- ६१२, एमएयूएस-१६२, एमएयूएस-७२५, एमएयूएस -७३१

५---तीळ---फुले-१, पंजाब-१, अेकेटी-६४, जेएलटी-७

६---तूर---बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३, बीडीएन-७०८, बीडीएन-७११, बीडीएन-७१६,गोदावरी

७---मूग---बीएम-४, बीपीएमआर-१४५, बीएम-२००२-०१, बीएम-२००३-०२, उत्कर्षा

८---उडीद---बीडीयु-१, टीएयु-१, टीपीयु-४

९---मका ---पॉपकॉर्न, महाराजा, युवराज, बायो-९६८१

१०---सूर्यफूल---सरळ जाती ः एलएसएफ-८, एलएस-११, ,,,,संकरित जाती ः केबीएसएच-४४, एलएसएफएच-३५, एलएसएफएच-१७१

संपर्क - डॉ. वासुदेव नारखेडे, ७५८८०८२१८४, (अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com