Pankaja Munde : पंचगंगा प्रदूषणमुक्तीवर आराखडा; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरणार, पंकजा मुंडेंचे आश्वासन

Veterinary Officers : कोल्हापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदांचा आढावा मुंडे यांनी घेतला. रिक्त पदांच्या भरतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
Pankaja Munde
Pankaja Mundeagrowon
Published on
Updated on

Panchganga River Pollution Kolhapur : ‘पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करा. त्याला मंत्रालयातून मंजुरी दिली जाईल. पावसाळ्यापूर्वी आराखड्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू केले पाहिजे’, अशा सूचना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी (ता.२७) अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. मंत्री मुंडे यांनी शासकीय विश्रामगृहात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुंडे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदांचा आढावा मुंडे यांनी घेतला. रिक्त पदांच्या भरतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा, असेही त्या म्हणाल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पशुधनाची संख्या जास्त आहे त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरली जातील, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले.

पर्यावरण आणि पशुसंवर्धनमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. मुंडे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. दुपारच्या सत्रात त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला कोल्हापूर शहरातील प्रमुख उद्योजकांचीही उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये पंचगंगेच्या वाढत्या प्रदूषणावर चर्चा झाली. "नदीकाठावरच्या गावांमधून तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका क्षेत्रांतून दररोज लाखो लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगेत मिसळत आहे. त्यासोबत नदीकाठावर कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. दोन्ही महापालिकांची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. पंचगंगा नदी दिवसेंदिवस मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या?," असा सवाल मंत्री मुंडे यांनी केला.

Pankaja Munde
Pankaja Munde : उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही - पंकजा मुंडेंचा एल्गार; धनंजय मुंडे यांचा जरांगेंवर पलटवार

मुंडे पुढे म्हणाल्या, "नदीकाठच्या गावांमध्ये तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत तसेच कारखानदार, उद्योजक, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्यासोबत व्यापक बैठक घेऊन पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा कृती आराखडा तयार करावा", असे आदेश मुंडे यांनी दिले.

"मंत्रालयस्तरावरून या आराखड्यास मंजुरी दिली जाईल. मात्र, पावसाळ्यापूर्वी पंचगंगा शुद्धीकरणाचे काम सुरू झाले पाहिजे, असे निर्देश मुंडे यांनी दिले. या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे, डॉ. मतकरी, डॉ. सुशील शिंदे यांच्यासह कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com