
Pune News : प्रतिवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान गडावर शनिवारी (ता.१२) दसरा मेळावा घेतला. आपण महाराष्ट्राची वाघीण असून कोणाला घाबरणारी नाही. तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याच्या दौऱ्याला निघणार असल्याची यावेळी पंकजा यांनी घोषणा केली. तसेच उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे आश्वासन पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून दिले.
राज्यात काहीच दिवसात विधानसभेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे।निवडणुकीचा माहोल गरम झाला आहे. सकाळी ११ वाजता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला. तसेच दुपारी पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर दसरा मेळावा झाला. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मेळाव्यातून मनोज जरांगे यांच्यावर निशाना साधला.
यावेळी पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामागारांच्या प्रश्नांसा हात घालत त्यांचे प्रश्न मांडले. तर त्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय, उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचे आश्वासन भगवान गडावरून दिले. उसतोड कामगारांचे आयुष्य बदलण्यासाठी कितीही वर्ष लागो, त्यांते जीवन सुसह्य केल्याशिवाय आपण श्वास घेणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून आपल्याला वेदना होतात, असेही पंकजा यांनी म्हटलं आहे. तर आपण कुणाला घाबरत नसून अंधारात कोणाला भेटत नाही. मंत्री असतानाही आपण कधीच दुजाभाव केला नाही. बीडचा विकास केला. मागणी नसताही रस्ते दिले. जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. एकही गाव सोडलं नसल्याचा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.
तसेच आपण महाराष्ट्राची वाघीण असून आपल्याला आपला डाव खेळायचा असून पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषण केली. पुढे त्या म्हणाल्या, लोकांनीच आपल्याला जिंकवलं, आपल्याला इज्जत दिली. मात्र आपला पराभव झाल्यानंतही त्यात कमी झाली नाही. सर्वात अधिक इज्जत दिली. आता राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरा करायचा आहे. नवा डाव खेळायचा आहे. याची सुरूवात परळीतून करू. परळीतून आम्ही धनु भाऊला निवडून देणारच असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
यावेळी आपण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सगळीकडे जाणार असून लोक चांगल्या दिवसांची वाट पाहत आहेत. त्यांच्या या आशेसाठी आपण राज्यभर जाऊ, आता तयारी करा, कोयते घासून ठेवा. पण दिवाळी केल्याशिवाय येथून जाऊ नका. मतदान केल्याशिवाय जाऊ नका. आपण हरल्यामुळे नाराज होऊ नका असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी बीडकरांना केले आहे.
मनोज जरांगेंवर टीका
दरम्यान या दसरा मेळाव्यातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता टीका केली. १२ वर्षांच्या काळात मतभेद असतनाही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहिलो. कधीही दुसरा मेळावा घेण्याचा विचार केला नाही. ज्याला जो वारसा दिलाय आहे. तो त्याने चालवायला पाहिजे आणि तो पंकजाने पुढे चालवला. आज याचा आनंद येथे दिसत आहे. मात्र नवीन मेळावा सुरु करून कोणीही या मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.