Kokan Water Project : कोकणात वाहून जाणारे पाणी वळविणारी योजना मार्गी लागणार

Radhakrishna Vikhe Patil : आता राज्याचे जलसंपदा खाते अहिल्यानगरला राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्याने ही योजना मार्गी लागणार असल्याची आशा उंचावली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ही योजना पूर्ण करुन शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर, नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या काही भागांतून कोकणात समुद्राकडे वाहून जाणारे पश्‍चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याची योजना अनेक वर्षांपासून चर्चिली जात आहे. मात्र आता राज्याचे जलसंपदा खाते अहिल्यानगरला राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्याने ही योजना मार्गी लागणार असल्याची आशा उंचावली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ही योजना पूर्ण करुन शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.

अहिल्यानगर, नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागातून पावसाळ्यात २२.९ टीएमसी पाणी समुद्राकडे वाहून जाते. हे पाणी जर पूर्वेकडे वळवले, तर अहिल्यानगरसह मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर होण्याला मदत होईल, असे स्पष्ट करत माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

Radhakrishna Vikhe Patil
Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी काही जलसंपदा प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. उत्तर कोकणातील नदीखोऱ्यांतून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनेद्वारे आणि उपसा नदीजोड/वळण योजनांद्वारे पाणी वळविण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. यासाठी एकूण साधारण १४ हजार ४० कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते.

उत्तर कोकणातील नार-पार, अंबिका औरंगा, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात अतिरिक्त पाणी शिल्लक आहे. पश्‍चिम वाहिनी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी प्राथमिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.

Radhakrishna Vikhe Patil
Jayakwadi Water Project : ‘जायकवाडी’तील विसर्ग वाढवला

या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांद्वारे तसेच उपसा नदीजोड/वळण योजनांद्वारे एकूण ८९.९२ टीएमसी पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार जवळपास ७.४ टीएमसी पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे तर १५.५ टीएमसी पाणी हे प्रमुख उपसा वळण योजनांद्वारे असे एकूण मिळून २२.९ टीएमसी पाणी वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

नाशिकमधील झार्लीपाडा वळण योजनेतून पाणी प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील वाघाड धरणामध्ये व त्यापुढे जायकवाडीत सोडण्यात येण्याची योजना आहे. पार-गोदावरी नदीजोड योजनेअंतर्गत १७ धरणे बांधून या धरणातील पाणी प्रवाही पद्धतीने एकत्रित करून उपसा करून करंजवन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या बोगद्याद्वारे ३.४२ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित आहे.

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा तयार केला होता. त्याचे धोरणात रूपांतर झाले आहे. गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पाणी वळवण्याचे ऐतिहासिक काम पूर्ण करायचे असून कृष्णा खोऱ्यातील पाणी प्रश्‍नाबाबतही निश्‍चित धोरण घ्यावे लागेल.
राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com