Drought Management : संभाव्य चारा, पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन करा

IAS Jitendra Papalkar : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल साठवण तलावातून होणारा पाणी उपसा थांबविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
IAS Jitendra Papalkar
IAS Jitendra PapalkarAgrowon

Hingoli News : जिल्ह्यातील गाळपेरा जमिनीवर तत्काळ चारा पिकांची लागवड करावी. चारा लागवडीचे क्षेत्र वाढवून जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. त्यासाठी वैरण विकास योजनेतून तत्काळ अंमलबजावणी करावी. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल साठवण तलावातून होणारा पाणी उपसा थांबविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी यांची सोमवारी (ता. १) आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पापळकर बोलत होते. या वेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एस. इंगोले, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता संजय अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी (सांख्यकी) सतीष बोथीकर, पाणीटंचाई विभागाचे अनिल पाथरकर, बालाजी निर्मले, आक्रम शेख उपस्थित होते.

IAS Jitendra Papalkar
Water Crisis : नाशिकला मार्चमध्येच टॅंकरचे द्विशतक

पापळकर म्हणाले, की तापमानात वाढ झाल्यामुळे जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेल असे नियोजन करावे. गरज पडल्यास जलस्रोतातून सिंचनासाठी उपसा करण्यात येणाऱ्या कृषिपंपाची वीज तोडण्यात यावी.संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल साठवण तलावातून होणारा पाणी उपसा थांबविण्यात यावा.तसेच जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्संचाही त्यांनी आढावा घेतला.

IAS Jitendra Papalkar
Drought Conditions : राज्यात दुष्काळाचे संकट गडद; मोठ्या धरणांमध्ये ३७.९१ पाणीसाठा

जिल्ह्यातील गाळपेरा जमीन क्षेत्रात पशुसंवर्धन विभागाने आधुनिक बियाणे चारा उत्पादक शेतकऱ्यांना पुरवावे. मका व न्यूट्री सीड आदी चारा बियाण्यांचे वाटप करावे. चारा बियाणे वाटप करताना जनावरांना पोषक चारा मिळेल, अशा बियाण्यांचेच वितरण करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. चारा पिकाखालील क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश देत पशुधनाला लागणारी हिरवी वैरण भविष्यात पुरेल असे नियोजन करावे, अशा सूचना पापळकर यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. इंगोले यांना दिल्या.

मराठवाड्यात मार्च महिन्यापासूनच पाण्यासोबत चाराटंचाईची शक्यता वाढत जाते. मात्र, हिंगोली जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी पावले उचलली असून यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार भविष्यात चारा आणि पाणीसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल अशा आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी पशुधन हे अत्यंत महत्त्वाचे असून ते टिकविण्यासाठी या कामात कोणतीही हयगय होता कामा नये, असे निर्देश पापळकर यांनी यावेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com