Fodder Seed : सांगली जिल्ह्यातील ५ हजार पशुपालकांना चारा बियाणे वाटप

Department Of animal Husbandry : जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ८४९ शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ३५ हजार किलो वैरण बियाणे वाटप केले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
Fodder Crop Management
Fodder Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील दुभत्या जनावरांसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चारा बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ८४९ शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ३५ हजार किलो वैरण बियाणे वाटप केले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो. दुधाचे अर्थकारण मोठे आहे. जिल्ह्यात १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चाराटंचाईची भीषणता वाढू लागली आहे. दर वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारा बियाणांसाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद केली जाते.

Fodder Crop Management
Fodder Shortage : खानदेशात चाराटंचाई कायम

तालुक्यातून किती शेतकरी चारा बियाण्यांची मागणी केली जाते, त्यानुसार बियाणे दिले जाते. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वच तालुक्यात चाराटंचाई भासणार असल्याने चारा बियाण्यांच्या निधीत ७५ लाखांनी वाढ केली आहे. अर्थात यंदा बियाण्यांसाठी १ कोटी निधीची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ३० लाख रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले होते.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात ७० लाख रुपयांच्या तरतुदीतून बियाणे शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संबंधित विभागाला अर्ज मागवण्यासाठी उद्दिष्ट दिले होते. तसेच संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची चारा बियाणे मागणी अर्ज घेतले.

Fodder Crop Management
Fodder Shortage : नगर जिल्ह्यातून चारा इतरत्र नेता येणार नाही

प्रत्येक तालुक्यातून चारा बियाण्यांसाठी मागणी आली आहे. शेतकऱ्यांनी चारा बियाणे मागणी केल्यानुसार याची तालुकानिहाय याद्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली. त्यानंतर ड्रॉ पद्धतीने शेतकऱ्यांनी निवड करून शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रत्येक लाभार्थीला सात किलोच्या पॅकिंगमध्ये १४०० रुपयांचे मका बियाणे वाटप केले आहे.

तालुकानिहाय चारा बियाणे वाटप

तालुका लाभार्थी संख्या प्रति लाभार्थी ७ किलोप्रमाणे बियाणे

मिरज ७२० ५,०४०

कवठेमहांकाळ ३४५ २,४१५

जत ६८५ ४,७९५

आटपाडी २६६ १,८६२

तासगाव ५२५ ३,६७५

शिराळा ७४० ५,१८०

कडेगाव ४१५ २,९०५

विटा-खानापूर ३२५ २,२७५

वाळवा ७२५ ५,०७५

पलूस २५४ १,७७८

एकूण ५,००० ३५,०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com