
Palghar News : जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उन्हाळी शेती व्हावी म्हणून मृद व जलसंधारण विभाग ठाणे या कार्यालयामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पिंपूर्णा लघु पाटबंधारा, धरण २० वर्षांपूर्वी बांधण्यात आले. मात्र, या धरणातील पाण्याचा वापर किंवा लाभ अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
ही बाब संबंधित शेतकऱ्यांनी आमदार हरिश्चंद्र भोये यांची नुकतीच भेट घेत निदर्शनास आणून दिली. धरणाच्या जवळील गावांना जूनच्या अखेरीस पाणी टंचाईचा सामना दरवर्षी करावा लागतो. या धरणातील पाणी हे धरण बांधताना नियोजनपूर्वक केले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत, त्यामुळे पाण्याचा वापर होत नाही.
मृद व जलसंधारण विभाग ठाणे अंतर्गत, दमण गंगा खोरेकरिता जव्हार तालुक्यातील पिंपूर्णा गावाच्या वरती चालतवड गावाजवळ लेंडी नदीवर उपयुक्त जलसाठ्याकरिता शेतकऱ्यांसाठी पिंपूर्णा धरण बांधण्यात आले आहे.
धरणाची लांबी २३६ मीटर असून, उंची १७.४५ मीटर आहे. यामुळे जलस्रोताची लांबी ७७.५० मीटर आहे. या धरणात सध्याही जूनअखेरीस मोठा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, कालव्याला पाणी सोडले जात नसल्याने, कालव्याखालील गाव सध्या पाणी टंचाईच्या झळा सोसत आहेत.
कालव्याची लांबी, उजवा कालवा ६ कि.मी. आणि डावा कालवा ०.२७० घन मी. सेमी आहे. धरणातील पाण्याचा शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा होणार आहे. शेतकरी शेतीकरिता लाभक्षेत्र शेतीयोग्य क्षेत्र १७६ हेक्टर असून, सिंचन क्षेत्र १६८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
मात्र राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील आदिवासी गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी धरणातील पाण्यापासून मुकावे लागते. त्यामुळे पाऊस सुरू झाला की त्या धरणातील एवढा मोठा पाणीसाठा वाया जातो. योजनेच्या स्थापनेचा उद्देश सिंचन सुविधा देणे हा असला, तरी प्रत्यक्षात पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे शेतकरी पावसावर अवलंबून आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरवर्षी पाटाची दुरुस्ती
पिंपूर्णा धरणाच्या पाटाची दुरुस्ती दरवर्षी केली जाते; मात्र प्रत्यक्षात त्या पाटाचे पाणीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. शेतीसाठी पाण्याची टंचाई कायम आहे. सरकारी निधी खर्च करूनही जर पाणी मिळत नाही, तर अशा योजनेचा उपयोग काय? प्रशासनाने योजनेचा आढावा घेऊन पुढील वर्षी तरी शेतकऱ्यांना हे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.