Pedhi Irrigation Project : ‘निम्न पेढी’ प्रकल्पातील बाधित गावांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

Agriculture Irrigation : निम्न पेढी प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुर्णत्वास गती देणे आवयश्यक आहे.
Pedhi Irrigation Projct
Pedhi Irrigation Projct Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : जिल्ह्यातील दुसरा मोठा सिंचन प्रकल्प म्हणून निम्न पेढी प्रकल्प साकारण्यात येत आहे. यातील भुसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. सात गावांतील बहुतांश नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतर केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

मंगळवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात निम्न पेढी प्रकल्पातील बाधित गावांच्या पुनर्वसन, वाढीव मोबदला आणि पुनर्वसित गावातील मूलभुत आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम., अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी प्रसेनजित चव्हाण, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता मेघा अक्केवार, तहसीलदार विजय लोखंडे, अजितकुमार येळे आदी उपस्थित होते.

Pedhi Irrigation Projct
Irrigation Project : निम्नपेढी प्रकल्प अडकला लालफितशाहीत

श्री. येरेकर म्हणाले, की निम्न पेढी प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुर्णत्वास गती देणे आवयश्यक आहे. प्रकल्पात सुमारे ७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार असून यातून १ हजार ३०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणीही उपलब्ध होणार आहे. प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाइपने पाणीपुरवठा होणार असून सुमारे ३५० किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.

ते म्हणाले, की जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निम्न पेढी प्रकल्प महत्त्वाचा असून प्रशासनाकडून प्रकल्प पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने बुडीत क्षेत्रातून अद्याप स्थलांतरीत झाले नसलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी ज्या गावांना जमीन आवश्यक आहे, त्यांची उपलब्धता करण्यात येणार आहे.

Pedhi Irrigation Projct
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करा ः बच्चू कडू

ही जागा नागरिकांच्या सोयीची असणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत नागरिकांनी जागेचा ताबा घेतल्यास त्यांना घरकुल योजनेत समाविष्ट करून घर बांधण्यासाठी सहाय्य पुरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ते म्हणाले, की वाढीव मोबादला म्हणून १०१ कोटींचा निधी प्राप्त झाला असून २७८ कुटुंबांना पहिल्या टप्प्यात ५७ कोटींचे वाटप करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करून यात पाणी साठविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रसासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com