Legislative Session : ज्येष्ठांना तीर्थयात्रा घडविणार

CM Eknath Shinde : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २९) विधानसभेत केली.
 Legislative Council
Legislative Council agrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २९) विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. भाविक अमरनाथ यात्रा, अयोध्येतील राम मंदिर येथे दर्शनासाठी जातात. अनेकांना चारधाम यात्रा करायची असते. तशी अपेक्षा ते मुलांकडे व्यक्त करतात. मात्र काही जणांना शक्य होत नाही. त्यामुळे यामध्ये सरकारने लक्ष घालून त्या संदर्भात योजना आखावी, अशी मागणी त्यांनी केली.

 Legislative Council
Maharashtra Budget Session 2024 : शेतकऱ्यांना मोफत वीज

महाराष्ट्र सरकारने एक तीर्थ दर्शन योजना आखावी. जिल्ह्याच्या ठिकाणी त्याची नोंदणी करावी. परराज्यांमध्ये गेल्यानंतर कोणती अडचण आल्यास त्यांना मदत करण्यासंदर्भात एक यंत्रणा तयार होईल. त्या दृष्टीने प्रयत्न करावा, अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली. ज्याप्रमाणे तरुण, शेतकरी, महिलांना अर्थसंकल्पामध्ये स्थान दिले, त्याप्रमाणे राज्यातील भाविकांनाही स्थान द्यावे, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मागणी लावून धरल्यानंतर श्री. शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना जाहीर केली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाइन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल.’’ या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य राम कदम, प्रकाश सुर्वे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.

 Legislative Council
Parliament Session 2024 : सरकारने खरीप पिकांच्या हमीभावात विक्रमी वाढ केली : राष्ट्रपती मुर्मू 

विरोधी पक्षनेते संतापले

सभागृहातील अनुपस्थितीवरून पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. वडेट्टीवार यांना डिवचले. याला हरकत घेत श्री. वडेट्टीवार यांनी आपली प्रकृती बरी नसल्याने मी सभागृहात उपस्थित नव्हतो, असे सांगितले. तसेच यासंदर्भात पत्र दिले होते, याची कल्पना अध्यक्षांना दिली होती. अध्यक्षांनी या दोघांना रोखणे आवश्यक होते, असा संताप व्यक्त केला.

‘तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली’

तीर्थक्षेत्र दर्शन योजनेसंदर्भातील घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींवरून विरोधकांना डिवचले. ‘‘आम्ही घरगुती वापराचे तीन सिलिंडर मोफत दिल्याने काही जणांना गॅस झाला आहे. तसेच तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा शेतकऱ्यांना तुम्ही काय दिले? आम्ही शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफ केले आहे.

आम्ही शेतकऱ्यांना अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी १५ हजार कोटी रुपये दिले आहेत. तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असे म्हणतात. मात्र तुम्ही काय दिले,’’ असा प्रश्‍न श्री. शिंदे यांनी केला. त्यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घालत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com