Inauguration of MCDC : ‘एमसीडीसी’च्या उद्‍घाटनाला लोकप्रतिनिधींचीच दांडी

MCDC Headquarter Update : राज्याच्या सहकाराला चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘एमसीडीसी’ अर्थात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या नव्या मुख्यालयाच्या उद्‍घाटन सोहळ्याला केंद्र किंवा राज्य सरकारमधील एकही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
Inauguration of MCDC
Inauguration of MCDCAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या सहकाराला चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘एमसीडीसी’ अर्थात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या नव्या मुख्यालयाच्या उद्‍घाटन सोहळ्याला केंद्र किंवा राज्य सरकारमधील एकही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

देशाच्या सहकारात पायाभूत काम करणाऱ्या महाराष्ट्रात सहकाराच्या विकासासाठी महामंडळ असणे ही खरे तर लोकप्रतिनिधींसाठी जमेची बाजू आहे. सहकारी संस्थांच्या मदतीनेच सर्व पक्षांमधील बहुतेक लोकप्रतिनिधी राजकीय वाटचाल करीत असतात. परंतु हेच नेते पद मिळताच सहकाराकडे सोईस्करपणे कसे दुर्लक्ष करतात, याचे उदाहरण म्हणजे महामंडळाच्या मुख्यालयाचा उद्‍घाटन सोहळा. पुण्याच्या साखर संकुलमध्ये महामंडळाचे सुसज्ज मुख्यालय उभारण्यात आले आहे. त्याच्या उद्‍घाटनासाठी गुरुवारी (ता.२६) विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सोहळ्याकडे एकही लोकप्रतिनिधी किंवा सहकारातील नेता फिरकला नाही.

Inauguration of MCDC
Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसानग्रस्तांना दिलासा

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महामंडळाच्या मुख्यालयाचे उद्‍घाटन होणार होते. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. त्यामुळे सकाळपासून उद्‍घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. परंतु उद्‍घाटक किंवा पाहुणे सोडाच परंतु मंत्रिमंडळातील एकही प्रतिनिधी किंवा

सहकारातील इतर पक्षांचा नेतादेखील या कार्यक्रमाकडे आला नाही. त्यामुळे उद्‍घाटन शेवटी सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या बळकटीकरणात महामंडळाला अभिकर्ता (नोडल एजन्सी) म्हणून नियुक्त करण्यात येत श्री. तावरे यांनी जाहीर केले. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Inauguration of MCDC
Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

या वेळी अपर निबंधक मिलिंद आकरे, कृषी संचालक विनय आवटे, विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, समन्वयक रमेश शिगटे, धनंजय डोईफोडे, महाव्यवस्थापक शिल्पा कडू, ज्योती शंखपाल, व्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, दिगंबर साबळे उपस्थित होते.

सहकार आयुक्त म्हणाले...

अटल अर्थसाह्य योजनेतून ४२८ संस्थांना कर्ज व अनुदानासाठी ७२.४२ कोटी रुपयांचा निधी

१०० संस्थांना दोन कोटींचे कर्ज व ५३ साडेपाच कोटी रुपयांचे अनुदानवाटप

सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना महामंडळाकडून चार वर्षांत ८५ कोटींचा खतपुरवठा

महामंडळाने २५० प्रशिक्षण कार्यक्रमातून १५ हजार शेतकऱ्यांना दिले प्रशिक्षण

राज्यातील १२ हजार सहकारी विकास सोसायट्यांचे बळकटीकरण होणार

राज्यातील सहकारी सोसायट्यांचे संकणकीकरण सुरू. आतापर्यंत ८ हजार सोसायट्यांना संगणक पुरवठा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com