Mango Circular : इतर राज्यांतील आंबा ‘हापूस’ नावाने विकल्यास दंड

Mumbai Market Committee : इतर राज्यातून आलेल्या आंब्याची ‘हापूस’ या नावाने विक्री केल्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पुणे आणि मुंबई बाजार समितीने परिपत्रक काढले आहे.
Mango
Mango Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : दरवर्षी आंबा हंगामात कोकणातील हापूस आंब्यासोबत इतर राज्यांतील आंबादेखील मोठ्या प्रमाणात दाखल होतो. इतर राज्यातून आलेल्या आंब्याची ‘हापूस’ या नावाने विक्री केल्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पुणे आणि मुंबई बाजार समितीने परिपत्रक काढले आहे.

इतर राज्यातील आंबा ‘हापूस’ नावाने विकल्यास संबंधित व्यापाऱ्याचा आंबा जप्त करून दंड, परवाना निलंबित किंवा परवाना रद्द करण्याची कारवाईदेखील करण्यात येणार आहे. बाजार समित्यांमध्ये कोकणचा राजा, अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्या शिवाय केरळ, गुजरात, कर्नाटक यांसह इतर राज्यांतून आंबा येतो;

Mango
Mango Market : वाशीत हापूस दरात हजार रुपयांची घट

मात्र इतर राज्यांतील आणि कोकणातील आंब्याच्या चवीत, सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस रसाळ, चवीस चांगला असतो. त्यामुळे सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते ग्राहकांची फसवणूक करतात. आंब्यांची अदलाबदल करून विक्री करतात.

Mango
Mango Tree Burnt : ऐन बहरात शेकडो आंब्याची झाडे खाक

मागील वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला पुणे बाजार समितीत कर्नाटक, केरळ येथून आलेला आंबा हा ‘कोकण हापूस’ या नावाने लेबल लावून विक्री करतानाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे पणन संचालकांनी याबाबत तपासणी करून कारवाईचे आदेश दिले होते.

परराज्यांतील आंबा हा महाराष्ट्रात उत्पादित झालेला आहे किंवा ‘कोकण हापूस’ आहे, असे भासवून विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत कारवाईचे आदेश बाजार समितीने दिलेले आहेत.

‘हापूस’च्या नावाने इतर राज्यांतून आलेल्या आंब्याची विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी बाजार समितीमार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे. अशा प्रकारामुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होत असून दरही खाली येतो.
संजय पानसरे, संचालक, बाजार समिती, वाशी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com