Central Warehouse Corporation : शेतीमाल साठवणुकीमध्ये केंद्रीय वखार महामंडळाचे योगदान

Article by Milind Aakre and Hemant Jagtap : गोदाम व्यवस्थापन यंत्रणेमध्ये विविध वस्तूंचा तपशील व गोदामांमधील धान्याची साठवणूक, ग्राहकांचा संपूर्ण तपशील, वखार विकास व नियामक प्राधिकरणामार्फत नोंदणीकृत ग्राहकांचा तपशील इत्यादीचे व्यवस्थापन करण्यात येते.
Central Warehouse Corporation
Central Warehouse CorporationAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Contribution of Central Wakhar Corporation : केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम व्यवस्थापनातील यशस्वितेचे अनुकरण शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी करणे गरजेचे आहे. गोदाम व्यवसाय दिसायला सोपा असला, तरी तेवढाच किचकट व जोखमीने भरलेला आहे. याकरिता गोदामधारक संस्थेला आपले ब्रॅण्ड तयार करावा.

ब्रॅण्ड म्हणजेच विश्‍वासाचे प्रतीक, यामुळेच केंद्रीय वखार महामंडळ असो अथवा राज्य वखार महामंडळ असो शेतकरी व व्यापारी वर्गाचा विश्‍वास खासगी गोदाम व्यवस्थेपेक्षा शासकीय गोदाम व्यवस्थेवर जास्त असतो. राज्यात व्यापारी वर्गाने मोठमोठी गोदामे बांधली असतील तरीही व्यापारी वर्ग स्वत:च्या गोदामात माल न ठेवता शासकीय गोदामांमध्येच शेतीमाल किंवा इतर माल साठवितात. केंद्रीय वखार महामंडळ त्यापैकीच एक आहे.

केंद्रीय वखार महामंडळाची बलस्थाने

केंद्रीय वखार महामंडळाकडे गोदामांची उपलब्धता, ग्राहकांचे मोठे नेटवर्क, गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मालाची आवक-जावक होते. मालाची वितरण व्यवस्था, गोदाम व्यवस्थापन यंत्रणेमध्ये विविध वस्तूंचा तपशील व गोदामांमधील धान्याची साठवणूक, ग्राहकांचा संपूर्ण तपशील, वखार विकास व नियामक प्राधिकरणामार्फत नोंदणीकृत ग्राहकांचा तपशील इत्यादीचे व्यवस्थापन करण्यात येते.

केंद्रीय वखार महामंडळामार्फत मालाचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक रसायनांचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रामुख्याने रसायनविरहित हर्मेटिक स्टोअरेजसारख्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Central Warehouse Corporation
Central Warehouse Corporation : केंद्रीय वखार महामंडळाचे नियोजन

हर्मेटिक बॅगचा वापर

भारतात धान्य साठवताना मुख्य चिंता म्हणजे हवामान व त्यामुळे साठविलेल्या धान्यावर होणारा परिणाम. हर्मेटिक बॅग विशेषतः हवामान आधारित होणाऱ्या नुकसानकारक घटकांवर काम करते. हर्मेटिक बॅग कमी आर्द्रता आणि थंड तापमानासह नियंत्रित वातावरण तयार करतात. या पिशव्यांमधील हवाबंद तंत्रज्ञान धान्यांचे संरक्षण करते, ज्यामुळे बाहेरील हवामानाचा त्यांच्यावर प्रभाव पडत नाही.

हर्मेटिक पिशव्या एक हवाबंद, स्वयं-नियमन आणि नियंत्रित वातावरण तयार करतात. यामध्ये ओलावा पातळी व्यवस्थित राहते. परिणामी, ओलावा नसल्यामुळे धान्य खराब होत नाही. जास्त आर्द्रतेमुळे कीटकांचा प्रादुर्भाव किंवा बुरशीची वाढदेखील होत नाही. त्यामुळे भारतातील काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी हर्मेटिक बॅग हा सर्वोत्तम उपाय आहे.

हर्मेटिक बॅग्ज या मल्टिलेयर रिसायकल करण्यायोग्य पॉलिथिलीन मटेरिअल (PE)पासून बनविलेल्या असतात. ज्यामध्ये हवा आणि आर्द्रता बॅगमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी काळजी घेतली जाते. याकरिता बॅगमध्ये एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ वापरण्यात आला आहे. हर्मेटिक पिशव्या धान्य, तृणधान्ये, मसूर, कडधान्ये आणि विविध प्रकारच्या बियांची साठवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

हर्मेटिक पिशव्यांचा वापर पीठ, औषधी वनस्पती, हळद आणि मसाले साठवणूक करण्यासाठी करतात. याव्यतिरिक्त, कॉफी, कोको बीन्स आणि चहा या सारखे पदार्थ त्यात साठवणे अलीकडच्या काही वर्षांत अधिक लोकप्रिय झाले आहे. या पिशव्या काजू आणि शेंगदाणे यांसारखे पदार्थ साठवण्यासाठीसुद्धा वापरता येतात. या पिशव्या विविध आकारात येतात आणि व्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी वापरल्या जाऊ शकतात.

हर्मेटिक स्टोअरेज कीटकनाशकांशिवाय ओलावा आणि कीटक नियंत्रण करण्यास मदत करते. हर्मेटिक सीलबंद स्टोअरेज सिस्टीममध्ये धान्य हवाबंद कंटेनरमध्ये ठेवले जाते, ज्यामुळे बाहेरील वातावरण आणि साठवलेले धान्य यांच्यामध्ये ऑक्सिजन आणि ओलावा याचे व्यवस्थापन केले जाते. हर्मेटिक स्टोअरेज ही साठवलेल्या तृणधान्ये, तेलबिया व कडधान्ये या कृषी मालामध्ये ओलावा आणि कीटक नियंत्रित करण्यासाठी सीलबंद, हवाबंद युनिट्स वापरण्याची एक पद्धत आहे.

हर्मेटिक पद्धतीमध्ये पिशव्यांचा वापर करण्यात येतो. या पिशव्यांचे अनेक फायदे आहेत

(i) कीटकनाशकांचा वापर न करता धान्य टिकवून ठेवणे,

(ii) अनेक महिन्यांपासून किमान दोन वर्षांपर्यंत धान्य चांगल्या दर्जाचे ठेवणे,

(iii) धान्याची किमत जास्त असताना शेतकऱ्यांना गरजेनुसार विक्री करण्याचा पर्याय उपलब्ध होतो,

(iv) शेतकऱ्यांना धान्य आणि बियाणे साठवण्यासाठी पर्यायी व्यवस्था हर्मेटीक पद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. हर्मेटिक पिशव्या हवाबंद असतात, ज्यामुळे ऑक्सिजन आणि आर्द्रता यांचा साठवलेल्या धान्यामध्ये समतोल साधला जातो. सेंद्रिय हर्मेटिक स्टोरेज (OHS), व्हॅक्यूम हर्मेटिक फ्युमिगेशन (VHF) आणि गॅस हर्मेटिक फ्युमिगेशन (GHS) या तीन वेगवेगळ्या प्रकारांतर्गत हर्मेटिक स्टोअरेज सिस्टमचे वर्गीकरण केले जाते.

हर्मेटिक पिशव्यांचे काही प्रमुख तोटे आहेत जसे की तीक्ष्ण वस्तूंपासून पंचर होऊ शकतात. कीटक आणि उंदरांपासून ओरखडे आणि छिद्र पडणे इत्यादी धोके या साठवणूक तंत्रज्ञानामध्ये असतात.

Central Warehouse Corporation
Agriculture Warehouse : गोदाम व्यवस्था अन् शेतीमाल वाहतुकीला चालना

केंद्रीय वखार महामंडळाच्या व्यावसायिक संधी

केंद्रीय वखार महामंडळाने वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत ३७४ गोदामे नोंदणीकृत केली आहेत. केंद्रीय वखार महामंडळ हे एक आयएसओ मानांकित महामंडळ असून, ग्राहकांमध्ये महामंडळाची उत्तम प्रतिमा असल्याने माल साठवणुकीत ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते.

विशिष्ट कालावधीच्या अंतराने केंद्रीय वखार महामंडळ आपल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला गोदाम विषयातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल काही ठरावीक कालावधीकरिता प्रशिक्षण दिले जाते.

केंद्रीय वखार महामंडळाकडे रेल्वे आधारित सेवा उपलब्ध आहेत, निर्यातीकरीता कंटेनर उपलब्ध असून, सरकारी व प्रायव्हेट कंपनी यांच्यासोबत विशेष उद्देश वाहन (SPV) म्हणून काम करू शकते. केंद्रीय वखार महामंडळ स्तर-२ व स्तर-३ अशा दोन्ही प्रकारच्या शहरांमध्ये ई -कॉमर्स कंपन्यासोबत व्यवसाय उभारणी करू शकते.

तसेच लॉजिस्टिक पार्क व स्टील कार्गो यार्ड या प्रकारच्या सेवांमध्ये सहभागी होऊन धान्यावर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी सुविधाची निर्मिती महामंडळ करू शकत

रिपोजिटरी व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यासोबत कामकाज करून शेतकरी व व्यापारी यांच्याकरिता वखार पावती योजना कार्यान्वित करून कर्ज वितरणाद्वारे व्यावसायिक लाभ मिळविण्यासाठी एक विशिष्ट प्रणालीची निर्मिती करणे, इलेक्ट्रॉनिक वखार पावती (ईएनडब्ल्यूआर) देणे, बँकेकडून वखार पावतीवर कर्ज देण्याची सुविधा पुरविणे, गोदामातील साठविलेल्या मालाची खरेदी, विक्री, लिलाव व व्यापार या सेवांद्वारे महामंडळ आपल्या ग्राहकांना सुविधा पुरवू शकते.

केंद्रीय वखार महामंडळासमोरील आव्हाने

महामंडळाचे विविध विभाग जसे की कृषी गोदाम व्यवस्था, औद्योगिक वेअरहाउसिंग, कंटेनर फ्रेट स्टेशन, इनलँड क्लिअरन्स डेपो, कंटेनर रेल्वे ट्रान्स्पोर्टेशन इत्यादींना खासगी स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. कृषी गोदाम क्षेत्रात मोठ्या कंपन्यांनी प्रवेश केल्याने व खासगी गोदाम सेवा पुरवठादार कमी पैशात गोदाम सेवा पुरवीत असल्याने केंद्रीय वखार महामंडळाला स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. भारत सरकारच्या माध्यमातून धान्य आणि इतर कृषिक्षेत्राशी निगडित वस्तूंची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीईजी टॅक्स प्रोत्साहन आणि मुद्दल गुंतवणूक अनुदान यासारख्या प्रोत्साहन योजनांची अंमलबजावणी महामंडळाने यशस्वीपणे केली आहे.

२०२२-२३ मधील ठळक बाबी

महाराष्ट्र राज्यात ३२ वखार केंद्र असून त्यांची साठवणूक क्षमता ७.३२ लाख टन आहे.

महामंडळाची उलाढाल २१०४.५१ कोटी रुपये आहे. महामंडळाचा निव्वळ नफा रुपये ३६९.५८ कोटी.एकूण साठवणुकीमध्ये धान्य साठवणुकीचे प्रमाण ४६.७१ लाख टन.

बारा राज्यांत २९ ठिकाणी १३.६४ लाख टन क्षमतेची नवीन साठवणूक क्षमता. महामंडळामार्फत एकूण ५ टक्के लाभांश वाटप.त्याची रक्कम १५९.६७ कोटी रुपये आहे.

महामंडळामार्फत पेस्ट कंट्रोल व्यवसायाच्या माध्यमातून २९.४३ कोटी रुपयांची उलाढाल.

विशिष्ट साठवणूक तंत्रज्ञानाचा वापर करून साठवणुकीमध्ये होणारे नुकसान ०.१३ टक्क्यापर्यंत कमी केले आहे.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com