Financial Investment : आर्थिक गुंतवणुकीसाठी संयम महत्त्वाचा

Finance and Investment : पुण्यातून गावाकडं आलो की बऱ्याच लोकांना भेटतो. त्यापैकी बरेच जण शेअर मार्केट विषयी बोलतात. कितीतरी ट्रॅजेडी ऐकायला मिळत आहेत.
Financial Plan
Financial PlanAgrowon

अमोल साळे

Finance Plans : पुण्यातून गावाकडं आलो की बऱ्याच लोकांना भेटतो. त्यापैकी बरेच जण शेअर मार्केट विषयी बोलतात. कितीतरी ट्रॅजेडी ऐकायला मिळत आहेत. अमुक अमुकने शेअर मार्केटमध्ये इतके पैसे गुंतवले आणि मग सगळे बुडाले. याने त्याच्या मित्राकडे गुंतवायला म्हणून पैसे दिले आणि पैसे बुडाले.

त्याने आपल्या वडिलांकडून वीस लाख रुपये घेतले आणि ट्रेडिंगमध्ये बुडाले. कुणीतरी वडिलांना न सांगता आईकडून सोने घेतले ते विकले ट्रेडिंगमध्ये ते बुडाले. अमुक अमुकचे दुकान लय भारी चालत होते. मोठा गल्ला होत होता. तो शेअर मार्केटच्या नादी लागला आता कर्जबाजारी आहे. अशा एक ना अनेक ट्रॅजेडी आहेत.

Financial Plan
Finance Management : विमा, बचतीमधून वाढवा आर्थिक बळ

शेअर मार्केटमध्ये केल्या जाणाऱ्या ट्रेडिंग व्यतिरिक्त ड्रीम इलेव्हन, रमी सर्कलमध्ये सुद्धा खूप लोक बरबाद होत आहेत. काही घटना तर इतक्या दुर्दैवी आहेत की त्या ऐकून झोप येणार नाही. घरं उद्‍ध्वस्त होत आहेत. काही लोक आत्महत्येपर्यंतसुद्धा पोहोचत आहेत. या सगळ्यात एक कॉमन फॅक्टर म्हणजे तरुण आणि पौगंडावस्थेतील मुलं यात बळी पडण्याचे प्रमाण जास्त आहे.

माझ्या आर्थिक नियोजनाच्या कोर्सच्या निमित्ताने मी अनेक लोकांच्या संपर्कात येतो. माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या बहुतांश लोकांची अपेक्षा ही क्विक मनी म्हणजेच शॉर्टकट वापरून श्रीमंत होण्याचा मार्ग शोधण्याची असते. म्हणजे माझ्या कोर्स विषयी ऐकून माझ्याकडे दहा जण आलेत तर त्यापैकी फक्त तीन ते चार जण कोर्स पुढे चालू ठेवतात.

असे का होते? मी जेव्हा कोर्सविषयी पूर्ण माहिती देतो त्या वेळी बहुदा त्यांचा भ्रमनिरास होत असेल. बरेच जण शेअर्सच्या लिस्ट किंवा टिप्स किंवा ट्रेडिंग स्ट्रॅटेजी मिळतील या आशेने येतात. मी कुणालाही सहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आश्‍वासन देत नाही. किंबहुना, ट्रेडिंगपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. त्या वेळी बहुतेक लोकांचा भ्रमनिरास होतो.

Financial Plan
Finance Commission : वित्त आयोगाच्या निधी उधळपट्टीस आता मर्यादा

आपला समाज प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट शोधत असतो. आणि तसे करता करता खूप मोठा लॉंग कट घेऊन बसतो, कधी कधी सगळे काही गमावून बसतो. या संदर्भात पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे :
संपत्ती निर्मितीत शॉर्टकट नाही. कष्टाला पर्याय नाही.
जर कोणी शॉर्टकट आहे असे सांगत असेल तर तो तुम्हाला फसवत आहे.
आजकाल ट्रेडिंग हे जुगाराला पर्याय म्हणून उभे राहते की काय असे वाटू लागले आहे.
भारतात ट्रेडिंगमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोक फिक्स डिपॉझिट इतकेही रिटर्न्स मिळू शकत नाही. हा डेटा वारंवार समोर आला आहे.

भारतात सरासरी ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक तोटा प्रत्येक ट्रेडरला होतो हाही डेटा समोर आला आहे.
तरीसुद्धा इतके लोक ट्रेडिंग का करत असावेत? कारण तुम्ही जितकी अधिक ट्रेडिंग कराल तितके अधिक ब्रोकरेज भराल, स्टॅम्प ड्यूटी भराल, जीएसटी भराल. म्हणजे थोडक्यात अधिकाधिक ट्रेड घेणे हे फायनान्स इकोसिस्टीमला आणि सरकारला फायद्याचे आहे. दारू आणि सिगारेटच्या विक्रीतून जसे उद्योगांना आणि सरकारला मोठा महसूल मिळतो अगदी त्याप्रमाणे ट्रेडिंगमधून सुद्धा मिळतो.
ट्रेडिंग तुमच्या मेंदूला डोपामाइन बूस्ट देते. ट्रेड घेतल्यावर जी एक्साइटमेंट असते त्या एक्साइटमेंटमुळे बऱ्याच जणांना ट्रेडिंगचे व्यसन लागते.

ही गोष्ट पुन्हा पुन्हा समजून घेतली पाहिजे, की यशाला शॉर्टकट नाही. गुंतवणूक ही साधक बाधक प्रक्रिया असते. ती एका रात्रीत होऊ शकत नाही. एखादे झाड लावल्यानंतर ते वाढण्यासाठी मोठा काळ द्यावा लागतो. तितका काळ दिल्यावर आणि संयम ठेवल्यावर कित्येक पटीमध्ये फळ मिळतात. गुंतवणुकीचेही तसेच आहे.

(लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com