Finance Commission : वित्त आयोगाच्या निधी उधळपट्टीस आता मर्यादा

कर्मचाऱ्यांचे पगार, सत्कारसमारंभांना मज्जाव
Finance Commission
Finance CommissionAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : राज्यातील ग्रामपंचायतींना केंद्रीय वित्त आयोगाचा (Finance Commission) निधीची उधळपट्टी करता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. विकास व पायाभूत सुविधांसाठी हा निधी वापरावा.

मात्र कर्मचाऱ्यांचे पगार, वाहनखरेदी किंवा सत्कारसमारंभाचे कार्यक्रम करू नयेत, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून राज्यातील ग्रामपंचायतींना अब्जावधी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. मात्र या निधीचा गैरवापर होऊ नये, असे आदेश केंद्राने दिले आहेत.

वित्त आयोगाने हा निधी देताना स्थानविशिष्ट गरजांतर्गत कामाची अंमलबजावणी, देखभाल, व्यवस्थापन आणि भांडवली खर्च यामध्ये फरक केलेला नाही. मात्र ग्रामीण जनतेला सेवा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतींना वार्षिक देखभाल तसेच सेवा करार करता येतील.

परंतु अन्य अनुत्पादक तसेच जनतेला थेट सेवा उपलब्ध करून न देणाऱ्या कामांवर निधी खर्च करता येणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.

Finance Commission
Fund : वित्त आयोगाचा निधी रखडला

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींच्या इतर कामांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

“आयोगाचा निधी हा अबंधित स्वरूपाचा आहे. त्याचा वापर ग्रामपंचायतींना स्थानिक गरजेनुसार अत्यावश्यक बाबींवर करता येतो.

मात्र कर्मचाऱ्यांचे पगार किंवा आस्थापनाविषयक बाबींवर निधी खर्च करता येत नाही, असे ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी भिसाजी जोईल यांनी सरपंच परिषदेला कळविले आहे.’’

Finance Commission
पाणी पुरवठा योजनांना हवा  पंधराव्या वित्त आयोगाचा निधी 

...या कामांसाठी निधी वापरता येणार
- स्वच्छता, हागणदारी मुक्ती, पाणीपुरवठा योजना,
-पावसाळ्यात जलपुनर्भरण, लसीकरण, कुपोषण रोखणे


- पथदीप, स्मशानभूमी, सार्वजनिक वाचनालये, क्रीडा,
- ग्रामीण बाजारहाट, कचरा व्यवस्थापन आदी

...या कामांवर निधी खर्चण्यास मज्जाव
- सत्कार, सांस्कृतिक कार्य, सजावट, उद्घाटन
- निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मानधन, प्रवासभत्ता, महागाई भत्ता देणे


- कर्मचाऱ्यांना वेतन, मानधन देणे किंवा शिधा देणे. पुरस्कार वाटणे
- करमणुकीचे कार्यक्रम घेणे, वाहनांची खरेदी, वातानुकूलित उपकरणांची खरेदी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com