सहा ऑनलाईन ट्रेडिंग पोर्टल्स eNAM शी जोडणार
केंद्र सरकार लवकरच सहा ऑनलाईन कृषी पोर्टल्स इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केटसोबत (eNAM) जोडणार आहे. सरकारच्या या निर्णयाने कृषी व्यापारालाच चालना मिळण्यासोबतच शेतकरी आपल्या उत्पादनाला रास्त दरही मिळवू शकणार आहेत.
हे ही वाचा - तीन जिल्ह्यांत दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर गहू पीक २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात कृषी व्यापारातील ३१,३६६ कोटी रुपयांचे व्यवहार eNAM च्या माध्यमातून झाले होते. चालू आर्थिक वर्षात देशभरातून झालेले (एप्रिल ते जानेवारी) eNAM वरील व्यवहार ४२,१६३ कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहेत. २०१६ साली eNAM चा वापर सुरु झाला. तेंव्हापासूनची ही सर्वोच्च उलाढाल ठरली आहे.
हे ही वाचा - कापसाच्या उत्पादन आणखी 5 लाख गाठींनी घटणार! कृषी व्यापारात e-NAM ची एकाधिकारशाही निर्माण होणे आम्हाला नको होते. शेतकऱ्यांना आपला शेतमाल रास्त दरात विकत येणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतरांच्या माहितीचा उपयोग व्हायला हवा म्हणून इतर अनेक संस्था e-NAM सोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
असे एकत्रित व्यासपीठ खरेदीदार आणि उत्पादकांसाठी अधिक सोईस्कर गोष्ट असल्याची प्रतिक्रिया स्माल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सॉर्टियमचे (SFAC) व्यवस्थापकीय संचालक नीलकमल दरबारी यांनी बिझनेसलाईनशी बोलताना व्यक्त केली आहे.
या नवीन पुढाकारात वाहतूक, वेअरहाऊसिंग, गुणवत्ता निर्धारण, साठवणूक, कर्जपुरवठा, तांत्रिक आधार, कृषी व्यापारविषयक सेवा आदींचा समावेश आहे. आणखी १५ संस्थांकडून e-NAM सोबत सहकार्य करण्याचा प्रस्ताव आला आहे.
कृषी व्यापारातील ऑनलाईन प्लँटफार्मस आणि e-NAM यांच्या परस्पर सहकार्याने शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) , व्यापारी आणि कृषी साखळीतील इतर भागधारकांच्या गरजा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही दरबारी यांनी व्यक्त केला आहे.
कृषी व्यापार क्षेत्रातील इतर अनेक संस्था e-NAM सोबत जोडल्या गेल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. एसएफएसी (SFAC) ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी संस्था असून कृषी व्यापार क्षेत्रातील अनेक घटकांच्या मदतीने छोट्या आणि माध्यम आकाराच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास हातभार लावण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.
e-NAM व्यतिरिक्त देशभरात १० हजार शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करण्यासाठी नोडल यंत्रणा म्हणूनही या संस्थेवर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आजमितीस देशभरातील १०० बाजारपेठा e-NAM शी जोडल्या गेल्या आहेत. आजमितीस १.७२ कोटी शेतकरी, २ लाख व्यापारी आणि १ लाख आडते e-NAM शी जोडल्या गेले असल्याचेही दरबारी म्हणाल्या आहेत.
काही खाजगी ऑनलाईन संस्था एका ठराविक भूप्रदेशात कार्यरत आहेत. काही राज्यात शेतकरी उत्पादक संघटनांच्या कार्यक्षेत्रातही e-NAM चे माध्यम उपलब्ध आहे. आर्थिक व्यवहार e-NAM च्या माध्यमातून झाले तरीही त्यासाठी स्थानिक नियमानुसार कृषी उत्पादन बाजार समितीचे शुल्क अदा करावे लागते. राजस्थानसारख्या राज्यात सर्वत्र एकच शुल्क आकारण्यात येते. तर गुजरातसारख्या राज्यात कमोडिटीनुसार हे शुल्क आकारण्यात येते. व्हिडीओ पाहा - खाजगी संस्थांना e-NAM शी जोडण्याच्या निर्णय यशस्वी ठरल्यावर ऑनलाईन प्लॅटफार्मवरील आर्थिक व्यवहारांना शुल्क आकारण्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ज्या व्यवहारातून शेतकऱ्यांना फायदा होतो आहे अशा व्यवहारासाठी केंद्र आणि राज्यांनीही ऑपरेशनला शुल्क घेण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.