Crop Insurance : गतवर्षीचा ४२७ कोटींचा पीकविमा मंजूर

Approved Insurance Claims : स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत १ लाख १६ हजार ७२० शेतकऱ्यांना १५७ कोटी १३ लाख २२ हजार ५०४ रुपयांचे विमा दावे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी दिली.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात मागील वर्षीच्या (२०२३) खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी), स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज), पीक कापणी प्रयोगावर आधारित (क्रॉप कटींग एक्सप्रिमेंट बेस्ड) उत्पादनातील घट या जोखीम बाबींतर्गत मिळून एकूण ४२७ कोटी १६ लाख ३३ हजारांवर पीकविमा भरपाई मंजूर झाली. त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत १ लाख १६ हजार ७२० शेतकऱ्यांना १५७ कोटी १३ लाख २२ हजार ५०४ रुपयांचे विमा दावे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी दिली.

मागीलवर्षी खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५९ हजार १३७ शेतकऱ्यांनी ७ लाख ६४ हजारांवर अर्ज दाखल करत ५ लाख १० हजार हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांतील पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्केहून अधिक घट गृहित धरुन मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीम बाबीअंतर्गत सर्व ५२ मंडलांतील ४ लाख ४१ हजार ९७० शेतकऱ्यांना २०६ कोटी ११ लाख ४७ हजार ८९ रुपये एवढी २५ टक्के अग्रिम विमाभरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी १९७ कोटी ६२ लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली.

Crop Insurance
Crop Insurance Penalty : पीकविमा कंपनीने उशिरा मोबदला दिल्यास १२ टक्के दंड

खरीप हंगामाच्या कालावधीत अतिवृष्टी, पूर आदी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा दावे (पूर्वसूचना) विमा कंपनीकडे दाखल केले होते. पात्र १ लाख १६ हजार ७२० शेतकऱ्यांना १५७ कोटी १३ लाख २२ हजार ५०४ रुपये विमादावे मंजूर करण्यात आले. त्यापैकी १५१ कोटी ४४ लाख रुपये अदा करण्यात आले. पीक कापणी प्रयोगाधारे सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या उत्पादनात घट आल्याबद्दल २० मंडलांतील ८९ हजार ७३४ शेतकऱ्यांना ६३ कोटी ९१ लाख ६४ हजार १०६ रुपये पीकविमा भरपाई मंजूर करण्यात आली असून, ५८ कोटी ३० लाख रुपये रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.मागील खरिपातील विविध जोखीमबाबी अंतर्गत मिळून आजवर ३ लाख ३३ हजार ५५२ शेतकऱ्यांना ४०७ कोटी ३६ लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०२३ खरीप विविध जोखीम बाबीअंतर्गत मंजूर पीकविमा स्थिती (कोटी रुपये)

जोखीम बाब शेतकरी विमा भरपाई रक्कम

मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती ४४१९७० २०६.११

स्थानिक नैसर्गिक आपत्ती ११६७२० १५७.१३

पीक कापणी आधारित ८९७३४ ६३.९१

Crop Insurance
Crop Insurance : दंडात्मक कारवाईचे स्वागत, पण...

स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीकनिहाय मंजूर विमादावे स्थिती (कोटींत)

पीक शेतकरी विमादावा रक्कम

सोयाबीन ३३४५ ५६.१५

कपाशी ५०८८९ ८०.९९

तूर २८०८७ १८.८९

मूग २६९५ ०.५८

उडीद ८८० ०.१६

ज्वारी ६७२ ०.३२

बाजरी ३८ ०.१

स्थानिक नैसर्गिक आपत्ती तालुकानिहाय मंजूर विमादावे स्थिती (रक्कम कोटींत)

तालुका शेतकरी विमादावा रक्कम

परभणी १२१४६ २४.९५

जिंतूर २५५०९ २७.९६

सेलू १६१६९ २१.५२

मानवत ७४२० १२.३७

पाथरी १०८६९ १५.९८

सोनपेठ ५४७८ ७.४४

गंगाखेड १०९६१ १४.७८

पालम १५२६५ १५.६८

पूर्णा १२९०३ १६.४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com