Rural Development
MGNREGAAgrowon

MGNREGA : मनरेगा अंतर्गत २३३ कोटी ९९ लाख रुपयांवर खर्च

Rural Employment Scheme : परभणी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती अंतर्गतच्या ४ लाख ३१ हजार ९९५ कुटुंबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत नोंदणी केली आहे.
Published on

Parbhani News : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) परभणी जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ३९ लाख ९४ हजार ४१४ मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ६४ लाख १२ हजार ९३ मनुष्यदिन (१६०.५३ टक्के) रोजगार निर्मिती झाली. नरेगाअंतर्गतच्या कामांवर शुक्रवार (ता. २५) पर्यंत २३३ कोटी ९९ लाख ३४ हजार रुपये खर्च झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती अंतर्गतच्या ४ लाख ३१ हजार ९९५ कुटुंबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत मजुरांची संख्या ८ लाख २९ हजार ६०९ असून सक्रिय जॉब कार्डाची संख्या २ लाख ५१ हजार ९६९ आहे.

Rural Development
MGNREGA Horticulture : रोजगार हमी योजनेतून फुलवा फळबाग ः संजय अटक

या योजनेत जिल्ह्यातील १ लाख २२ हजार १८१ कुटुंबांनी रोजगाराची मागणी केली असता १ लाख २१ हजार ८८५ कुटुंबांना कामे उपलब्ध करून देत रोजगार उपलब्ध करू देण्यात आला. २०२४-१५ या वर्षात जिल्ह्यात ३९ हजार ९४ हजार ४१४ मनुष्य दिन रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात ६४ लाख १२ हजार ९३ एवढे मनुष्य दिन रोजगार निर्मिती झाली.

Rural Development
MGNREGA : कुशल, अकुशल थकलेल्या कामाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

मनरेगाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ७ हजार ७०९ तर यंत्रणा सत्रावर ४ हजार ३०२ मिळून एकूण कामांची संख्या १२ हजार ११ आहे. ग्रामपंचायत स्तरावर २४ लाख ७४ हजार ६१० आणि यंत्रणा स्तरावर १५ लाख ५८ हजार ८६६ मिळून ४० लाख ३३ हजार ४७६ एवढी मजूर क्षमता आहे. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, सिंचन विहिरी, गोठा, घरकुल बांधकामे आदी कामांवर ३ हजार ४५२ कामांवर ४० हजार ८३६ मजूर उपस्थित होते.

परभणी जिल्हा मनरेगा स्थिती

तालुका सक्रिय जॉब कार्डधारक मनुष्य दिन निर्मिती खर्च

परभणी ३९०६५ १००८९०२ ३३ कोटी ४५ लाख ९५ हजार रुपये

जिंतूर ४०९५० १०३७१२४ ३८ कोटी २३ लाख ५२ हजार रुपये

सेलू ३४२४१ ८८४५८५ ३० कोटी ८३ लाख ४६ हजार रुपये

मानवत २५४७२ ७५७४९४ २४ कोटी ७० लाख ९७ हजार रुपये

पाथरी १४८६१ ४३६८९१ १२ कोटी ६ लाख १७ हजार रुपये

सोनपेठ १२७४७ ३०१०५८ ११ कोटी ५ लाख ५३ हजार रुपये

गंगाखेड २६१९१ ६०५५४५ २३ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपये

पालम १४९३४ ३६२८२० ११ कोटी ३२ लाख ५२ हजार रुपये

पूर्णा ४३८६८ १०१७६७४ ४८ कोटी ९९ लाख ४६ हजार रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com