Milk Production : दुग्धोत्पादन वाढीसाठी राबविणार पंचसूत्री कार्यक्रम

Dr. Madhusudan Ratnaparkhi : ‘‘जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढीसाठी ‘पशुपैदास सुधारणा, पशुधनाचे आरोग्य, वैरण विकास, पशुखाद्य आणि पशुधनाचे व्यवस्थापन’ या पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे,’’ अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.
Milk Production
Milk ProductionAgrowon

Hingoli News : ‘‘जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढीसाठी ‘पशुपैदास सुधारणा, पशुधनाचे आरोग्य, वैरण विकास, पशुखाद्य आणि पशुधनाचे व्यवस्थापन’ या पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे,’’ अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.

डॉ. रत्नपारखी म्हणाले, ‘‘दुष्काळी स्थितीत शेतीतील उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय शेतकरी, पशुपालकांसाठी फायदेशीर ठरत आहे. येत्या काळात हिंगोली जिल्ह्यात संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक जातिवंत पशुधनाची पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’

Milk Production
Milk Production : सिन्नर तालुक्यात दूध उत्पादन २० टक्क्यांनी घटले

‘‘राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिनेश टाकळीकर, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ. सखाराम खुने यांच्यासह जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढावे या उद्देशाने पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे,’’ असेही डॉ. रत्नपारखी म्हणाले.

‘‘पशुपैदास सुधारणा अंतर्गत आनुवंशिक सुधारणा, नवीन तंत्रज्ञानाद्वारे उच्च गुणवत्ता व उत्पादकता असलेल्या पशुधनाची निर्मिती, नवीन जाती ओळखणे, त्यांची दुग्ध उत्पादकता वाढविणे, पशुधनाचे आरोग्य या अंतर्गत प्रतिबंधात्मक, प्रवर्तक, उपचारात्मक उपाययोजनांद्वारे पशुपालकांना गुणवत्तापूर्ण पशुवैद्यकीय सेवा देणे याची अमंलबजवणी केली जात आहे.

Milk Production
Milk Production : स्वच्छ दूध उत्पादनाचे नियोजन

वैरण विकास घटक अंतर्गत उच्च पोषणमूल्यांच्या पौष्टिक चाऱ्याचे उत्पादन करणे, मूरघास निर्मिती यांचा तर पशुखाद्य या घटका अंतर्गत उच्च पोषणमूल्ययुक्त पशुखाद्याच्या वापरास प्रोत्साहन देणे, पशुधन व्यवस्थापन या बाबी अंतर्गत पशुधन व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास चालना देणे या कार्यक्रमाचा समावेश आहे,’’ असे रत्नपारखी म्हणाले.

‘‘जिल्ह्यात गाय वर्गातील २ लाख ३२ हजार पशुधन आहे. म्हैस वर्गातील ७४ हजार १२५ जनावरे आहेत. शेळ्यांची संख्या १ लाख ५४ हजार २८४ तर मेंढ्यांची संख्या १६ हजार ९०७ आहे. पंचसूत्री कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात निश्‍चित वाढ होईल,’’ असे डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com